महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'लाथ मारेल तिथे पाणी काढण्याची सवय, मी कुठल्याही खात्याचे काम करेन' - कॅबिनेट मंत्री यशोमती ठाकूर.

कॅबिनेट मंत्री यशोमती ठाकूर यांनी खातेवाटपाविषयी बोलताना "लाथ मारेल तिथे पाणी काढण्याची मला सवय आहे. त्यामुळे कुठल्याही खात्याचे काम मी करू शकेन" असे वक्तव्य केले आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चिडचिड आता वाढली आहे. त्यामुळे त्यांनी अहंकार बाजूला ठेवावा, असा सल्लाही यशोमती ठाकूर यांनी फडणवीस यांना दिला आहे.

thakur
कॅबिनेट मंत्री यशोमती ठाकूर

By

Published : Jan 4, 2020, 4:50 PM IST

अमरावती -राज्यात महाविकास आघाडीची सत्ता येऊन एक महिना उलटला आहे. त्यानंतर उर्वरीत ३६ मंत्र्यांचा शपथविधी पार पडूनसुद्धा नवनिर्वाचित मंत्री अद्यापही खात्याच्या प्रतिक्षेत आहेत. दरम्यान, कॅबिनेट मंत्री यशोमती ठाकूर यांनी खातेवाटपाविषयी बोलताना "लाथ मारेल तिथे पाणी काढण्याची मला सवय आहे. त्यामुळे कुठल्याही खात्याचे काम मी करू शकेन" असे वक्तव्य केले आहे.

कॅबिनेट मंत्री यशोमती ठाकूर

अनेक मंत्री आपल्याला वजनदार खाते मिळावे यासाठी फिल्डिंग लावत असल्याच्या चर्चा आहेत. यशोमती ठाकूर म्हणाल्या "मला काम करायचे आहे. ही खूप मोठी संधी मला मिळाली आहे. क्षण आणि क्षण वेचून मी काम करेन. खाते कुठलेही मिळो, मला जिल्ह्यासाठी आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी काम करायचे आहे"

हेही वाचा -'अमरावती जिल्ह्यात साकारणार कौशल्य विद्यापीठ'

दरम्यान, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या चुकीमुळे युती झाली नाही. त्यांची चिडचिड आता वाढली आहे. त्यामुळे, त्यांनी अहंकार बाजूला ठेवावा, असा सल्लाही यशोमती ठाकूर यांनी फडणवीस यांना दिला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details