अमरावती -जवळपास २००९ पासून मेहनत घेतलेल्या महत्वाकांक्षी गुरुकुंज उपसा सिंचन योजनेच्या सुमारे २२ गावातील सिंचनाचा प्रश्न मार्गी लागला. स्व. भैय्यासाहेब ठाकूर यांच्या स्वप्नातील ही शेतकरी हिताची योजना पूर्णत्वास गेली.(Gurukunj Upsa Irrigation Scheme) तिवसा मतदारसंघाची विधानसभा सदस्य म्हणून यशस्वी झाल्याबदल समाधान वाटते आहे अशी प्रतिक्रिया माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी दिली आहे.
Gurukunj Scheme: गुरुकुंज उपसा सिंचन योजनेमुळे बळीराजा सुखावल्याचे समाधान -यशोमती ठाकुर - गुरुकुंज उपसा सिंचन योजनेमुळे बळीराजा सुखावला
गेल्या ९ वर्षांपासून सातत्याने मेहनत घेत असलेली शेतकरी हिताची योजना 'गुरुकुंज' उपसा सिंचन योजना आज पूर्णत्वास गेली आहे. (Gurukunj Scheme) या योजनेमुळे बळीराजा सुखावला असल्याचे समाधान वाटत असल्याची भावना माजी मंत्री यशोमती ठाकुर यांनी व्यक्त केली आहे.

वडिलांचे स्वप्न पूर्ण केल्याचा आनंद -गुरुकुंज उपसा सिंचन योजनेच्या प्रकल्पातील पाणी अखेर तब्बल १५ वर्षांनी शेतकऱ्यांच्या शेत शिवारात पोहचले. गुरुकुंज उपसा सिंचन योजनेच्या सुमारे २२ गावातील सिंचनचा प्रश्न मार्गी लागला. अमृतासारखे पाणी शेतकन्यांच्या शेतात पोहचले. त्यामुळे आज सोन्यासारखा दिवस आहेत असही त्या म्हणाल्या आहेत. वडील भैय्यासाहेब ठाकूर यांनी पाहिलेलं स्वप्न आज पूर्ण झाले. गेल्या दहा वर्षांपासूनच्या संघर्षाला यश मिळाले. अखेर झोपलेला जलसंपदा विभाग जागा झाला आणि माझा बळीराजा सुखावला असल्याचे मत माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केले.