अमरावती :दोन समाजामध्ये भांडण लावण्याचे काम ( Violence in the name of religion ) काही गटांकडून हेतूपुरस्पर होत आहे. तसेच राज्यघटना संपवण्याची भाषा होत आहे. हे एक षडयंत्र काही गटांकडून सुरू असल्याचे मत काँग्रेस कमिटीचे हुसेन दलवाई ( Congress leader Hussain Dalwai ) यांनी येथे व्यक्त केले. ते भारत जोडो यात्रेकरिता ( Bharat Jodo Yatra ) शेगाव नगरीत आले होते. तेव्हा त्यांनी ईटीव्ही भारतशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.
Bharat Jodo Yatra: सत्त्ताधाऱ्यांकडून जोडण्याऐवजी तोडण्याची भाषा - हुसेन दलवाई - Bharat Jodo Yatra
धर्माच्या नावावर हिंसा ( Violence in the name of religion ) भांडणे लावून समाजामध्ये द्वेष पसरवण्याचं काम होत आहे. जोडण्याऐवजी तोडण्याची भाषा सत्त्ताधाऱ्यांकडून होत आहे अशी टीका काँग्रेस नेते हुसेन दलवाई ( Congress leader Hussain Dalwai ) यांनी केली आहे. ते ते भारत जोडो यात्रेकरिता ( Bharat Jodo Yatra ) शेगाव नगरीत आले होते. तेव्हा त्यांनी ईटीव्ही भारतशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.

सत्त्ताधाऱ्यांकडून घटना कट कारस्थान - संपवण्याचे बोलताना ते पुढे म्हणाले की, धर्माच्या नावावर हिंसा, भांडणे लावून समाजामध्ये द्वेष पसरवण्याचं काम होत आहे. जोडण्याऐवजी तोडण्याची भाषा सत्त्ताधाऱ्यांकडून होत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार मोडीत काढून त्यांच्याद्वारे लिखित असलेली घटना आज संपवण्याचे कटकारस्थान रचले जात असे आहे.
भारत जोडण्यासाठीची यात्रा -"ब्रेक दि कॉन्स्टिट्यूशन विदीन कॉन्स्टिट्यूशन" घटनेच्या चौकटीत राहूनच घटना कशी संपवता येईल , या पद्धतीनं बोलायचं नाही पण राज्यघटना संपवण्याचे काम होत आहे. या सर्व गोष्टीला शहद्याचा असेल तर राहुल गांधी यांनी भारत जोडण्यासाठीची यात्रा सुरू केली आहे. त्यामध्ये आपण सर्वांनी सामील होण्याची गरज असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.