अमरावती- सात जन्म सोबत राहण्याचे वचन देणाऱ्या पतीने अर्ध्यावर संसार सोडून आत्महत्या केल्याची माहिती मिळताच पत्नीनेही माहेरी विष पिऊन आत्महत्या केली. यात त्या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना अमरावतीच्या नांदगाव खनडेश्वर तालुक्यात घडली. मयूर रमेश मरगळे (वय 23) व पूनम मयूर मरगळे असे मृत पती-पत्नीचे नाव आहे. दरम्यान, पती-पत्नीने अचानक आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली असून पती-पत्नीच्या या आत्महत्येचे कारण समोर आले नसून पोलीस याप्रकरणी कसून तपास करीत आहेत.
अमरावतीत पतीने आत्महत्या केल्याचे समजताच पत्नीनेही संपवली जीवनयात्रा - amravati news
पतीने आत्महत्या केल्याची माहिती मिळताच पत्नीनेही माहेरी विष पिऊन आत्महत्या केली. यात तिता मृत्यू झाल्याची घटना अमरावतीच्या नांदगाव खनडेश्वर तालुक्यात घडली. मयूर रमेश मरगळे (वय 23) व पूनम मयूर मरगळे असे मृत पती-पत्नीचे नाव आहे.
पतीने आत्महत्या केल्याचे समजताच पत्नीनेही संपवली जीवनयात्रा
मयूर रमेश मरगळे (रा.शिवणी रसुलापूर) याचे याच तालुक्यातील येनस येथील रहिवाशी पूनमसोबत लग्न झाले होते. रक्षाबंधन निमित्त 15 ऑगस्ट रोजी मयूर पत्नी पूनमला तिच्या माहेरी सोडायला गेला होता. त्यानंतर रात्री तो घरी परतला. दरम्यान, शुक्रवारी मयूरचा भाऊ शेतातून घरी परतल्यानंतर गळफास लावलेल्या अवस्थेत त्याला मयूरचा मृतदेह आढळला. या घटनेची माहिती माहेरी मिळताच मयूरची पत्नी पूनमने विष पिऊन आत्महत्या केली.