अमरावती- १९ वर्षीय पत्नीवर लग्नाआगोदर 5 वर्षांपूर्वी बलात्कार करणाऱ्या नवऱ्याला जिल्हा व सत्र न्यायालयाने गुरुवारी १० वर्ष सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली. या आगळ्या वेगळ्या खटल्याची न्यायालय परिसरात चांगलीच चर्चा रंगली.
लग्नापूर्वी पत्नीवर बलात्कार; अल्पवयात शरीर संबंध ठेवल्याने पतीला 10 वर्षाची शिक्षा - अमरावती क्राईम न्यूज
पीडितेने वैद्यकीय अधिकऱ्यांना तिच्या सहमतीनेच शारिरीक संबंध प्रस्थापित झाल्याचे सांगितले. फिर्यादी फितूर झाल्यामुळे सदर घटनेचे प्रत्यक्ष साक्षीदार म्हणून पीडितेचे वडील, भाऊ तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांची साक्ष ग्राह्य धरुन न्यायालयाने आरोपीस शिक्षा ठोठावली.
काय आहे प्रकरण?
अमरावती जिल्ह्यातील शिरखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भिवापूर ते मंगरूळ येथील शेतशिवारालागत १५ मार्च २०१७ रोजी दुपारी २ वाजता फिर्यादी शाळकरी मुलगी (वय १४ ) ही शाळेतून घरी जात आसताना दोन युवकांनी तिला अडविले. एकाने तिला मागून पकडून लगतच्या शेतात नेले आणि तिच्यावर बळजबरी केली. घटनास्थळी पीडितेचे वडील आणि भाऊ आल्याचे पाहताच आरोपींनी पळ काढला होता. पीडित अल्पवयीन युवतीच्या तक्रारीवरून शिरखेड पोलीस ठाण्यात प्रणव काळमेघ आणि सागर कलमेघ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
फिर्यादीच झाली फितूर
पीडितेने वैद्यकीय अधिकऱ्यांना तिच्या सहमतीनेच शारिरीक संबंध प्रस्थापित झाल्याचे सांगितले. फिर्यादी फितूर झाल्यामुळे सदर घटनेचे प्रत्यक्ष साक्षीदार म्हणून पीडितेचे वडील, भाऊ तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांची साक्ष ग्राह्य धरुन न्यायालयाने आरोपीस शिक्षा ठोठावली.
घटनेच्या वेळी युवती होती अल्पवयीन
आम्ही सहमतीने शहरिरीक संबंध ठेवले असे तक्रारदार युवती आता सांगत आहे. आम्ही लग्न केले असा दावाही ती करत आहे. मात्र, जेव्हा शारीरिक संबंध प्रस्थापित झाले त्यावेळी ती अल्पवयीन होती आणि अल्पवयीन असताना शारीरिक संबंध प्रस्थापित करणे गुन्हा असल्याचे अतिरिक्त शासकीय अभियोक्ता मिलिंद जोशी यांनी न्यायल्यात सरकारची बाजू मांडताना स्पष्ट केले.
या प्रकारणात दोन्ही आरोपींना १० वर्ष सक्त मजुरी, ५ हजार रुपये दंड, दंड न भलेल्यास एक वर्ष सश्रम कारावास तसेच कलम ४२ पोस्को कायद्यांतर्गत शिक्षा ठोठावण्यात आली आहे.