अमरावती -शेजाऱ्याशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून पतीने पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अचलपूर तालुक्यातील कुष्ठा खुर्दमध्ये ही घटना घडली असून, या प्रकाराने गावात खळबळ उडली आहे. काठीने मारहाण करत पतीने पत्नीची हत्या केली. राहुल गौतम गायकवाड वय 30 रा. कुष्ठा खुर्द असे आरोपीचे नाव असून, पथ्रोट पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
दोन महिन्यांपूर्वी झाला होता प्रेमविवाह
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी राहुल गायकवाड याने दोन महिन्यांपूर्वी गावातच अमरावती येथील एका महिलेशी विवाह केला होता.सदर महिला पूर्वीच विवाहित असल्याने तिला दोन मुले आहेत. ही महिला आशा वर्कर म्हणून कार्यरत असल्याची माहिती समोर येत आहे. तर आरोपी राहुल गायकवाड हा मजुरीचे काम करत होता.