महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चारित्र्याच्या संशयातून पतीकडून 61 वर्षीय पत्नीची हत्या - amravati morchund murder

अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील राजुरा बाजार लगत असणाऱ्या मोरचुंद या गावात पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने तिच्या मानेवर धारदार शस्त्राने वार करून तिची हत्या केल्याची घटना घडली आहे.

amravati murder
पतिचा आपल्या 61 वर्षीय पत्नीवर संशय; धारदार शस्त्राने केली हत्या

By

Published : Feb 15, 2020, 8:01 AM IST

अमरावती -ऐन म्हातारपणात पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने तिच्या मानेवर धारदार शस्त्राने वार करून हत्या केली. शुक्रवारी सकाळी साडेसात वाजता अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील राजुरा बाजार लगत असणाऱ्या मोरचुंद या गावात ही घटना घडली.

हेही वाचा -

कल्याणमध्ये गावठी पिस्तुलांसह 2 आरोपी जेरबंद

शोभा रमेश बासुंदे (वय-61), असे मृत महिलेचे नाव आहे. शनिवारी सकाळी आरोपी रमेश बासुंदे (वय-66) दारू पिऊन घरी आला. यावेळी त्यांची दोन्ही मुले घरात नसताना रमेश बासुंदे याने पत्नी शोभा वासुंदे ही स्वयंपाक करीत असताना तिच्या मानेवर धारदार शस्त्राने वार केले. या घटनेत शोभा बासुंदे या जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर आरोपी रमेश बासुंदी यांनी गावातून पळ काढला. गावापासून काही अंतरावर वर्धा जिल्ह्यात येणाऱ्या फार येथे रमेश बासुंदे यांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, घटनेची माहिती गावाता वार्‍यासारखी पसरली. बासुंदी यांच्या नातेवाईकांनी विषारी औषध घेऊन बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या आरोपी रमेशला उपचारासाठी वर्धा जिल्ह्यात येणाऱ्या आष्टी येथील रुग्णालयात हलविले. आरोपीची प्रकृती ठीक असून, वरुड पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध पत्नीचा खून केलेल्या प्रकरणात कलम 302 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा -

आदिवासी आश्रमशाळेतील मुलीच्या आत्महत्येप्रकरणी तीन कर्मचारी निलंबित

ABOUT THE AUTHOR

...view details