अमरावती - पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत धारधार शस्त्राने पतीने हत्या केल्याची घटना आमरावतीच्या चांदूर बाजार हिरूळपूर्णा तालुक्यात घडली. खूनी एवढ्यावरच न थांबता त्याने स्वतःच्या मुलाचीही हत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आशिष पारधी यास अटक केली आहे.
अमरावतीत चारित्र्यवर संशय घेऊन पत्नीची हत्या, मुलाच्याही हत्येचा प्रयत्न - अमरावतीमध्ये खून
पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत धारधार शस्त्राने पतीने हत्या केल्याची घटना आमरावतीच्या चांदूर बाजार हिरूळपूर्णा तालुक्यात घडली.
आरोपीसह पोलिस
आरोपी आशिष पारधी याने काल मध्यरात्री आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला शिवीगाळ करून तिच्यावर धारधार शस्त्राने पोटावर व मांडीवर वार करून तिची हत्या केली .व मुलगा देवानंद यालाही जीवे मारण्याचा प्रयत्न केला.दरम्यान यात मुलगाही गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहे.हत्ये संमधी पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे.
Last Updated : Oct 31, 2019, 9:50 PM IST