अमरावती जिल्ह्यातील आष्टा शेतशिवारात अजगराने केली हरणाची शिकार, पाहा व्हिडिओ - dragon hunted deer
जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील आष्टा शेतशिवारात एका अजगराने हरणाची शिकार केल्याची घटना समोर आली आहे. या बाबत तात्काळ वनविभागाला माहिती देण्यात आली.
अजगराने केली हरणाची शिकार
अमरावती -जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील आष्टा शेतशिवारात एका अजगराने हरणाची शिकार केल्याची घटना समोर आली आहे. आष्टा शिवारातील रमेश मेश्राम यांच्या शेतात काही शेतकरी जात असताना कपाशी पिकांमध्ये अजगराने हरणाची शिकार करून गिळताना दिसल्याने त्यांनी तात्काळ वनविभागाला माहिती दिली. मात्र, या घटनेने शेतात अजगराचा वावर असल्याचे समोर आले आहे.त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे.