अमरावती- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी निवडणूक समितीच्यावतीने शहरात 'महापर्दाफाश' सभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, सभेत पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आघाडीच्या उमेदवार नवनीत राणा यांना निवडणून दिल्याबद्दल कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त करतो, असे म्हणताच सभेत चांगलाच गोंधळ सुरू झाला.
माणिकराव ठाकरेंनी नवनीत राणांचे नाव घेताच 'महापर्दाफाश' सभेत गोंधळ
'महापर्दाफाश' सभेला माणिकराव ठाकरे यांनी संबोधण्यास सुरुवात केली. सुरुवातीलाच त्यांनी अमरावती लोकसभा मतदारसंघात नवनीत राणा यांना निवडून दिल्याबद्दल आपला आभार व्यक्त करतो, असे म्हणताच मंचावर उपस्थित आमदार यशोमती ठाकूर यांनी त्यांना थांबवले. ठाकूर यांनी ठाकरेंना नवनीत राणांचे नाव का घेता? त्यांनी दगा दिला, असे म्हणताच गर्दीतून नवनीत राणा या भाजपत पळाल्या अशी आरडाओरड सुरू झाली.
'महापर्दाफाश' सभेला माणिकराव ठाकरे यांनी संबोधण्यास सुरुवात केली. सुरुवातीलाच त्यांनी अमरावती लोकसभा मतदारसंघात नवनीत राणा यांना निवडून दिल्याबद्दल आपला आभार व्यक्त करतो, असे म्हणताच मंचावर उपस्थित आमदार यशोमती ठाकूर यांनी त्यांना थांबवले. ठाकूर यांनी ठाकरेंना नवनीत राणा यांचे नाव का घेता? त्यांनी दगा दिला, असे म्हणताच गर्दीतून नवनीत राणा या भाजपत पळाल्या, अशी आरडाओरड सुरू झाली. सभागृहात सुरू झालेल्या वादंगाचे भान राखत माणिकराव ठाकरे यांनी आपले भाषण थेट भाजप सरकारवर टीका करण्याच्या दिशेने वळविले. त्यानंतरच सभागृहात कार्यकर्त्यांचा नवनीत राणांच्या विरोधातील रोष निवळला.