अमरावती - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने आज बारावीचा निकाल घोषित केला असून यावर्षी अमरावती विभागाचा निकाल 87.55 टक्के लागला आहे. कोकण, पुणे विभागानंतर अमरावती विभागाने बारावीच्या निकालात राज्यात तृतीय स्थान पटकावले आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक अमरावती विभागीय मंडळाचे अध्यक्ष गोसावी यांनी आज पत्रकार परिषद घेऊन याची माहिती दिली.
अमरावती विभागात एकूण 1 लाख 41 हजार 691 विद्यार्थी परीक्षेला बसले होते, यापैकी 1 लाख 24 हजार 49 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. अमरावती विभागात वाशिम जिल्ह्याने बाजी मारली असून वाशिम जिल्ह्याचा निकाल 91.55 टक्के लागला आहे. बुलडाणा जिल्ह्याचा निकाल 89.75 टक्के, अकोला जिल्ह्याचा निकाल 87.42 टक्के, यवतमाळ जिल्ह्याचा निकाल 86.73 टक्के आणि अमरावती जिल्ह्याचा निकाल 84.49 टक्के लागला आहे.