अमरावती Hotel Owner Display Birth Certificate : 'तुम्ही महाराष्ट्रात आहात तर येत्या दोन महिन्यांत दुकानांवर मराठी भाषेत पाट्या लावा,' असे आदेश सुप्रीम कोर्टानं सप्टेंबर महिन्यात दिले होते. मराठी पाट्या लावण्याच्या सक्तीविरोधात व्यापाऱ्यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. त्याची सुनावणी घेत न्यायालयानं व्यापाऱ्यांना दोन महिन्यांत मराठी भाषेत पाट्या लावण्याचे आदेश दिले होते. या निमित्तानं पुन्हा एकदा मराठी भाषेचा मुद्दा समोर आलाय. अशातच अमरावतीच्या एका हॉटेल व्यावसायिकानं 'मी महाराष्ट्रीय'च आहे असं म्हणत चक्क जन्म प्रमाणपत्राचं बॅनर लावलंय. सनी शेट्टी असं या हॉटेल व्यावसायिकाचं नाव आहे.
ट्रोलिंगला सडेतोड उत्तर : पठ्ठ्यानं 'मी महाराष्ट्रीय' लिहित थेट जन्म प्रमाणपत्रचा लावला बॅनर, पाहा व्हिडिओ
Hotel Owner Display Birth Certificate : सध्या राज्यात मराठी पाट्यांचा मुद्दा चांगलाच चर्चेत आहे. यावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आक्रमक भूमिका घेतलीय. अशातच अमरावतीच्या एका हॉटेल व्यावसायिकानं मी महाराष्ट्रीय असल्याचं लिहित आपलं जन्म प्रमाणपत्रच बॅनरवर छापलंय.
Published : Dec 2, 2023, 2:14 PM IST
ट्रोलर्सला कंटाळून लावला फ्लेक्स : मुंबईसह राज्यातील इतर शहरांमध्ये मराठी विरुद्ध परप्रांतीय असा कायमच वाद होत असतो. अलीकडेच एका अभिनेत्रीचा मला मराठी असल्याच्या कारणावरुन मराठी माणसाला घर नाकारण्यात आल्याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता. आडनावावरून लगेच त्या व्यक्तीची जात व प्रांत शोधण्याची व नंतर ट्रोल करण्याची परंपरा आपल्याकडे हल्ली सुरू झालेली आहे. या ट्रोलर्सला कंटाळून एका हॉटेल व्यावसायिकानं आपल्या रेस्टॉरंट बाहेर मोठ्या फ्लेक्सवर चक्क 'मी महाराष्ट्रीय' व जन्म प्रमाणपत्र लावून ठेवलेलं आहे.
बॅनरवर थेट जन्म प्रमाणपत्रच लावलं : सनी शेट्टी या युवकानं अमरावती इथं आपल्या उदर्निरावाहासाठी बडनेरा मार्गावर 2 वर्षापूर्वी रेस्टॉरंट सुरू केलं. मात्र शेट्टी नावावरुन ते आंध्र-कर्नाटकातील असावे असं लोकांना वाटत होतं. त्यावरून सनी शेट्टी यांना विविध मार्गानं ट्रोल केलं जात होतं. अखेर या ट्रोलर्सला कंटाळून सनी शेट्टी यांनी आपलं जन्म प्रमाणपत्र मोठ्या फ्लेक्सवर लावत 'मी महाराष्ट्रीय' असल्याचा त्यावर स्पष्ट उल्लेख केला. जन्म प्रमाणपत्रावर सनी शेट्टी यांचा जन्म चंद्रपूर मध्ये झाला असून आपण महाराष्ट्रीय असल्याचा उल्लेख या बॅनरवर केलाय. यामुळं सध्या 'मी महाराष्ट्रीय' हे बॅनर चांगलंच व्हायरल झालं असून चर्चेचा विषय ठरत आहे.
हेही वाचा :