अमरावती -अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यातील खटकाली येथील दोन वर्षीय चिमुकल्या बाळाला आजार झाल्याने रुग्णालयात न नेता त्याच्याच आजीने बाळाच्या पोटाला गरम विळ्याचे चटके दिले होते. ही संतापजनक घटना घडल्यानंतर महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी गंभीर दखल घेत रुग्णालयात जाऊन पाहणी केली होती. शिवाय चटके देणाऱ्या आजी विरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. मात्र चार दिवसानंतरही बाळाच्या प्रकृतीमध्ये कोणत्याही प्रकारची सुधारणा झाली नाही. अखेर काल रात्री(शनिवार) त्या बाळाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे मेळघाटमध्ये अंधश्रद्धेचे सत्र केव्हा थांबणार? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
हेही वाचा-बंधाऱ्यात बुडालेल्या तिघा भावंडांचे मृतदेह सापडले; सख्ख्या भावांची मिठी हृदय हेलवणारी
चिखलदरा तालुक्यातील खटकाली गावातील राजरत्न जमूनकार असे मृतक बाळाचे नाव आहे. आजार झाल्याने त्याला रुग्णालयात न नेता घरीच पोटाला चटके दिले होते. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने गुरुवारी त्याला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. दरम्यान त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने उपचाराला बाळाने प्रतिसाद दिला नाही, अखेर त्याचा दुर्दैवाने मृत्यू झाला आहे.
हेही वाचा-Magnet Man नाशिकच्या या व्यक्तीच्या शरीराला चिकटतात लोखंडी वस्तू, लस घेतल्यानंतर सुरू झाला प्रकार