महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'त्या' पुस्तकाची माहिती घेऊन योग्य ती कारवाई करणार - गृहमंत्री - भाजपने प्रकाशीत केलेल्या पुस्तकाची माहिती घेऊन योग्य ती कारवाई करणार

छत्रपती शिवाजी महाराज यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींशी तुलना करणारे पुस्तक भाजपने प्रकाशीत केले आहे. यावरुन चांगलेच वादंग निर्माण झाले आहे. यासंदर्भात योग्य ती माहिती घेऊन, कारवाई करणार असल्याचे वक्तव्य गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले.

Home Minister Anil Deshmukh
गृहमंत्री अनिल देशमुख

By

Published : Jan 13, 2020, 2:50 PM IST

अमरावती - छत्रपती शिवाजी महाराज यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींशी तुलना करणारे पुस्तक भाजपने प्रकाशीत केले आहे. यावरुन चांगलेच वादंग निर्माण झाले आहे. यासंदर्भात योग्य ती माहिती घेऊन, कारवाई करणार असल्याचे वक्तव्य गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले.

गृहमंत्री अनिल देशमुख


रविवारी दिल्लीत आज के शिवाजी नरेंद्र मोदी या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. हे पुस्तक भाजपचे नेते जय भगवान गोयल यांनी लिहले आहे. या पुस्तकाच्या प्रकाशनानंतर सर्वच स्तरातून भाजपवर टीका होत आहे. यावर गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही प्रतिक्रिया दिली. या पुस्तकाचे प्रकाशन कोणी केले आहे. त्या पुस्तकातून धार्मिक भावना दुखवण्याचा प्रयत्न होतोय का? याची सविस्तर माहिती घेऊन योग्य ती कारवाई करु, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिली.

For All Latest Updates

TAGGED:

ABOUT THE AUTHOR

...view details