अमरावती -शहरात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असताना ग्रामीण भागात मात्र कोरोना वाढतो आहे. ग्रामीण भागातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कोरोना रुग्णांचे गृह विलगीकरण बंद करण्यात आले असून 25 मेपासून नव्याने आढळणाऱ्या कोरोना रुगांना कोविड सेंटरमध्ये ठेवण्यात येत आहे.
'अशी' आहे ग्रामीण भागातील रुग्णसंख्या
अमरावती जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यापासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातला आहे. अमरावतीत 28 एप्रिलला कोरोना रुग्णांची संख्या 946वर पोहचली. त्यानंतर ही संख्या वाढत गेली आणि 8 मे रोजी कोरोना रुग्णांचा आकडा 1 हजार 241वर गेला. 8 ते 17 मेपर्यंत दररोज हजारापेक्षा अधिक कोरोना रुग्ण जिल्ह्यात आढळून आले. यामध्ये शहारापेक्षा ग्रामीण भागातील रुग्णसंख्या अधिक होती. सद्यस्थिती जिल्ह्यात 6 हजार 549 कोरोना रुग्ण असून यापैकी ग्रामीण भागात 4 हजार 872 रुग्ण आहेत.
ग्रामीण भागात रुगांना घरी राहण्यास बंदी
गृह विलगीकरणाच्या नावाखाली ग्रामीण भागात घरात असणारे रुग्ण घराबाहेर पडतात. काही जण तर शेतीची कामेही करत असल्याचे आढळून आले आहे. कोरोनाग्रस्तांचे असे बेफिकर वागणे कोरोनाच्या प्रसाराला कारणीभूत असून यामुळे ग्रामीण भागात कोरोना वेगात पसरते आहे. आता यावर पर्याय म्हणून राज्य शासनाने 18 जिल्ह्यातील गृहवीलगीकरण बंद केले असून या निर्णयामुळे कोरोना आटोक्यात येईल, अशी अपेक्षा आहे.
प्रत्येक तालुक्यात कोविड सेंटर