अमरावती - जिल्ह्यात मुसळधार पाऊस बरसतो आहे. 24 तासात जिल्ह्यातील धारणी, चिखलदरा आणि चांदुर बाजार तालुक्यात सर्वाधिक पाऊस कोसळला आहे. हवामान खात्याने मंगळवरी मुसळधार पाऊस कोसळणार असा अंदाज व्यक्त केला आहे.
अमरावती जिल्ह्यात मुसळधार पाऊस, धारणी, चिखलदरा, चांदूरबाजार तालुक्यात सर्वाधिक पाऊस - धामणगाव रेल्वे
पावसामुळे मेळघाटातील सिपनासह सर्व नद्या दुथडी भरून वाहत आहेत. यावर्षी जिल्ह्यातील पूर्णा नदीलाही चांगलेच पाणी आले आहे. कधी रिमझिम तर कधी मुसळधार असा पाऊस सर्वत्र कोसळतो आहे. 24 तासात अमरावती तालुक्यात 27.3 मी. मी. पाऊस बरसला आहे.
पावसामुळे मेळघाटातील सिपनासह सर्व नद्या दुथडी भरून वाहत आहेत. यावर्षी जिल्ह्यातील पूर्णा नदीलाही चांगलेच पाणी आले आहे. कधी रिमझिम तर कधी मुसळधार असा पाऊस सर्वत्र कोसळतो आहे. 24 तासात अमरावती तालुक्यात 27.3 मी. मी. पाऊस बरसला आहे. भातकुली तालुक्यात 10.8 मी. मी., नांदगाव खंडेश्वर तालुक्यत 16.8मी. मी., चांदुर रेल्वे तालुक्यात 21.2 मी. मी.,धामणगाव रेल्वे तालुक्यात 24.3 मी. मी,तिवसा तालुक्यात 20.9 मी. मी.,वरुड तालुक्यात 26.3, अचलपूर तालुक्यात19.6 मी. मी., मोर्शी तालुक्यात 24.9 मी. मी, दर्यापूर तालुक्यात 9.9 मी. मी.,अंजनगाव तालुक्यात 7.3 मी. मी. चांदूरबाजार तालुक्यात 47.1 मी. मी, धारणी तालुक्यात73 मी. मी. आणि चिखलदरा तालुक्यात 51.6 मी. मी. पाऊस बरसला आहे. जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून अमरावती शहरासह जिल्ह्यात सर्वदूर पाऊस कोसळतो आहे.