महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अमरावती जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस, हवामान विभागाचा अंदाज ठरला खरा - Amravati district

विदर्भातील अनेक जिल्ह्यांत पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. हवामान विभागाने नुकताच वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याचा अंदाज वर्तवला होता.

अमरावती जिल्ह्याच्या वादळी वाऱ्यासह पाऊस
अमरावती जिल्ह्याच्या वादळी वाऱ्यासह पाऊस

By

Published : May 30, 2021, 7:28 PM IST

अमरावती - विदर्भातील अनेक जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. हवामान विभागाने नुकताच विदर्भात वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याचा अंदाज वर्तवला होता. अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यातील टोंडगाव परिसरात वादळी वाऱ्यासह मोठ्या प्रमाणात गारपीट झाली आहे. या मान्सूनपूर्व पावसामुळे परिसरातील संत्रा बागांसह इतरही पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, या पावसामुळे शेतीच्या कामात अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे.

अमरावती जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला आहे. हवामान विभागाने नुकताच पावसाचा अंदज वर्तवला होता.

शेतकऱ्यांची बी-बियाणांसाठी लगबग सुरु

मान्सून (31 मे)ला कोकण किनारपट्टीवर दाखल होणार आहे. त्यानंतर (१० जून)नंतर हा मान्सून संपूर्ण राज्यात सक्रिय होणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. यंदा मान्सून वेळेवर दाखल होत असल्याने, शेतकऱ्यांची बी-बियाणांसाठी लगबग सुरू झाली आहे. अमरावती शहर व ग्रामीण भागातील अनेक कृषी दुकानात शेतकरी बियाणे खरेदीसाठी येत आहेत. दरम्यान, शहरातही दुपारी चारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. यामुळे गारवा पसरला होता.

हेही वाचा -अजित दादा आमचे तोंड फाटके आहे; सांभाळून बोला - चंद्रकांत पाटील

ABOUT THE AUTHOR

...view details