अमरावती - 'तौक्ते' चक्रीवादळामुळे विदर्भातील अनेक जिल्ह्यात तिन दिवस पाऊसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवीला होता. त्यामुळे आज (रविवार) शहरात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. हे वादळ सध्या केरळ, गोवा मार्गे कोकण किनारपट्टीवर धडकले आहे. शहरात आलेल्या या वादळी वारा व पावसामुळे वातावरणात कमालीचा गारवा निर्माण झाला आहे. दरम्यान या पावसामुळे शहरातील अनेक ठिकाणी झाडांची मोठी पडझड झाली असून वाहनांचे देखील नुकसान झाले आहे.तर अनेक ठिकाणी विद्युत रोहित्र देखील कोसळले आहे. या वादळाच्या पार्श्वभूमीवर विदर्भातील अनेक जिल्ह्यात पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
अमरावती शहरात मुसळधार पाऊस; अनेक ठिकाणी झाडे कोसळली - अमरावती पाऊस
अमरावती शहरात अचानक सुसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावल्याने मोठ्या प्रमाणावर झाडांची पडझड झाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरानजीकच्या रस्त्यांवर उभ्या असलेल्या कार व दुचाकीवर झाड कोसळ्याने नुकसान झाले आहे. शहरातील बियाणी चौक तसेच विद्यापीठ परिसरात वादळी वाऱ्यामुळे झाडे उन्मळून पडली आहे.
महाराष्ट्राच्या सागरी किनारपट्टीपासून सुमारे १५० किमी अंतरावरून तौक्ते चक्रीवादळ पुढे सरकत आहे. या वादळामुळे किनारपट्टीवर लाटांचे तांडव आणि मुसळधार पावसासह वादळी वाऱ्याचा फटका बसायला सुरुवात झाली आहे. हे वादळ महाराष्ट्र राज्याच्या किनारपट्टी भागात घोंगावत आहे. अमरावती शहरात अचानक सुसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावल्याने मोठ्या प्रमाणावर झाडांची पडझड झाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरानजीकच्या रस्त्यांवर उभ्या असलेल्या कार व दुचाकीवर झाड कोसळ्याने नुकसान झाले आहे. शहरातील बियाणी चौक तसेच विद्यापीठ परिसरात वादळी वाऱ्यामुळे झाडे उन्मळून पडली आहे. शहरातील काही भागातील वीज पुरवठा देखील खंडित झाला आहे, तर मनपा प्रशासन आता रस्त्यावर पडलेली झाडे तोडण्याच्या कामाला लागले आहेत.
हेही वाचा -तौक्ते चक्रीवादळ : मुख्यमंत्री आणि केंद्रीय गृहमंत्री यांच्यामध्ये दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक