अमरावती -शहरात आज सकाळी साडेसात वाजतापासूनच पाऊस बरसायला सुरुवात झाली. त्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. गेल्या तीन ते चार दिवसांपासून थंडी कमी झाली होती. मात्र, पावसामुळे अचानक वातावरणामध्ये गारवा निर्माण झाला आहे.
अमरावतीकरांना अवकाळी पावसाने झोडपले, वातावरणात पुन्हा गारवा
अमरावतीमध्ये गुरुवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास शहरात पावसाच्या जोरदार सरी बरसायला लागल्या. सलग १५ मिनटे हा पाऊस कोसळत होता. त्यानंतर रिमझिम पाऊस सुरू आहे. मात्र, आकाशात काळे ढग दाटून आले आहेत.
थंडी कमी होताच अमरावतीकरांना पावसाने झोडपले
गुरुवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास शहरात पावसाच्या जोरदार सरी बरसायला लागल्या. सलग १५ मिनटे हा पाऊस कोसळत होता. त्यानंतर रिमझिम पाऊस सुरू आहे. मात्र, आकाशात काळे ढग दाटून आले आहेत. यंदा अमरावतीकरांना फेब्रुवारीवारीच्या सुरुवातीपर्यंत कडाक्याची थंडी सहन करावी लागली. मात्र, गेल्या दोन ते तीन दिवसांपासून थंडी कमी झाली होती. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला होता. मात्र, आजच्या पावसामुळे वातावरणात पुन्हा गारवा निर्माण झाला आहे.