अमरावती - शहरासह संपूर्ण जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. जिल्ह्यात मागील 24 तासात 61 मिमी पावसाची नोंद करण्यात आली असून चांदुर रेल्वे तालुक्यात 140 मिमी, धामणगाव रेल्वे तालुक्यात 139.7 मिमी आणि नांदगाव खंडेश्वर तालुक्यात 110 मिमी पाऊस झाला आहे.
अमरावती जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला; चांदुर, धामणगाव तालुक्यात सर्वाधिक पाऊस - हवामान खाते
25 जुलैपासून जिल्ह्यात दमदार पावसाला सुरुवात झाली. यानंतर जिल्ह्यात कधी रिमझिम तर कधी मुसळधार संततधार पाऊस सुरु आहे. जिल्ह्यात 1 जून ते 30 जुलैपर्यंत 422.5 मिमी सरासरी पाऊस अपेक्षित असताना एकूण 337.4 मिमी पाऊस आतापर्यंत झाला आहे.
25 जुलैपासून जिल्ह्यात दमदार पावसाला सुरुवात झाली. यानंतर जिल्ह्यात कधी रिमझिम तर कधी मुसळधार संततधार पाऊस सुरु आहे. जिल्ह्यात 1 जून ते 30 जुलै पर्यंत 422.5 मी. मि. सरासरी पाऊस अपेक्षित असताना एकूण 337.4 मिमी पाऊस आतापर्यंत झाला आहे. यावर्षी मान्सून 21 जूनला जिल्ह्यात दाखल झाला. जुलै महिन्यात 20 तारखेनंतर पावसाचे वातावरण निर्माण झाले. तर 25 जुलैपासून दमदार पाऊस सुरू आहे.
आज सकाळपासून अमरावती तालुक्यात 63.7 मिमी पाऊस झाला. भातकुली तालुक्यात 34.2 मिमी, तिवसा तालुक्यात 71.3 मिमी, मोर्शी तालुक्यात 20.9 मिमी, वरुड तालुक्यात 25.3.मिमी, अचलपूर तालुक्यात 28.2 मिमी, चांदूरबाजार तालुक्यात 37.2 मिमी, दर्यापूर तालुक्यात 53.9 मिमी, अंजनगाव तालुक्यात 28.5 मिमी,धारणी तालुक्यात 43.3 मिमी आणि चिखलदरा तालुक्यात 57.4 मिमी पाऊस झाला आहे. यासोबतच जिल्ह्यात येत्या 24 तासात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.