अमरावती - राज्यात सर्वदूर मान्सून सक्रिय झाला असून अमरावती जिल्ह्यातही मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. आज दुपारी तीन वाजताच्या दरम्यान जिल्ह्याच्या चांदुर बाजार तालुक्यातही पाऊस धो धो बरसला. याच पावसामुळे तालुक्यातील शिरजगाव कसबा गावात पाणी शिरल्याने मुख्य रस्त्यावर पूरस्थिती निर्माण झाली होती. तर अनेकजण जीव धोक्यात घालून नदी पार करत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.
चांदूर बाजार तालुक्यात मुसळधार पाऊस, शिरजगाव कसबा गाव जलमय - चांदूर बाजार रेन न्यूज
पावसामुळे तालुक्यातील शिरजगाव कसबा गावात पाणी शिरल्याने मुख्य रस्त्यावर पूरस्थिती निर्माण झाली होती.
आज दुपारी तीन वाजताच्या सुमारास दमदार पावसाने हजेरी लावल्याने शिरजगाव कसबा हे गाव जलयम झाले होते. सुमारे एक ते दीड तास हा पाऊस एकसारखा येत राहिला. त्यामुळे गावांमधील सर्व रस्त्यांवर पाणीच पाणी होते. काही लोकांच्या घरात पाणीपण घुसले. या मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे गावातील रस्ते तुडुंब भरलेले होते.
गावातील बांधी रोड ते एसबीआय रोड, तसेच खालतीपुरा रोड, डोबान रोड, गुजरी बाजार रोड, गवत साथ रोड येथे मोठ्या प्रमाणात पाणीच पाणी होते. या मोठ्या प्रमाणात आलेल्या पावसामुळे लोकांच्या घरातसुद्धा मोठ्या प्रमाणावर पाणी गळले. अनेक शेतात मोठ्या प्रमाणावर पाणी शिरल्यावर शेतीचे मोठे नुकसान होण्याचीदेखील शक्यता नाकारता येत नाही. दुपारी आलेल्या या पावसाने गावातील छोट्या ओढ्यांना आलेल्या पुरातून देखील काही गावकरी वाहन चालवत असल्याचे समोर आले आहे.