महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अमरावतीमध्ये जोरदार पावसासह गारपीट, पिकांचे नुकसान - Amravati latest news

नववर्षाच्या तोंडावरच 8 दिवसांपूर्वी विदर्भातील अनेक जिल्ह्याला अवकाळी पावसासह गारपिटीने झोडपले होते.  या अवकाळी पावसामुळे तूर, कपाशी आणि रब्बी हंगामातील गहू, हरभरा या पिकांचे नुकसान झाले होते.

Heavy rain in Amravati
गारपीट

By

Published : Jan 8, 2020, 12:36 PM IST

अमरावती- आज (बुधवारी) सकाळी अमरावती जिल्ह्याच्या काही भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. मोर्शी तालुक्यातील नेरपिंगळाई परिसरातील आखतवाडा, बऱ्हाणपूर परिसरात पावसासह गारपिटीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तूर, हरभरा, गहू, संत्रा, कपाशी आदी पिकांना फटका बसला आहे. तर नेर पिंगळाई ते आखतवाडा रस्त्यावर वादळामुळे झाडे पडल्याने काही वेळ रस्ता बंद होता.

अमरावतीमध्ये जोरदार पावसासह गारपीट

हेही वाचा - नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ अचलपूर-परतवाड्यात तिरंगा रॅली

नववर्षाच्या तोंडावरच 8 दिवसांपूर्वी विदर्भातील अनेक जिल्ह्याला अवकाळी पावसासह गारपिटीने झोडपले होते. या अवकाळी पावसामुळेही तूर, कपाशी आणि रब्बी हंगामातील गहू, हरभरा या पिकांचे नुकसान झाले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details