अमरावती- दोन दिवसांची काहीशी उसंत घेऊन अमरावती शहरात आज (2 आॅगस्ट) पुन्हा पावसाला सुरुवात झाली. आज रात्री 8 वाजल्यापासून पुन्हा एकदा बरसायला लागला आहे.
अमरावतीत दोन दिवसांची उसंत घेऊन वरुणराजा पुन्हा सक्रिय - पाऊस
आठ दिवसांपूर्वीच अमरावती शहरात पावसाला सुरुवात झाली आहे. त्यानंतर बुधवारपासून पावसाने विश्रांती घेतली होती.
अमरावती
आठ दिवसांपूर्वी अमरावती शहरात खऱ्याअर्थाने पावसाला सुरुवात झाली आहे. त्यानंतर बुधवारपासून पावसाने विश्रांती घेतली होती. दोन दिवस वातावरण ढगाळ असताना आज दिवसभर पावसाचे कुठलेही चिन्ह नव्हते. मात्र, सायंकाळी 5.30 वाजेच्या सुमारास जोरदार पाऊस आला. मात्र, दहा ते पंधरा मिनिटात तो बेपत्ता झाला. त्यानंतर रात्री 8 वाजता पाऊस पुन्हा एकदा मुसळधार बरसायला लागला. त्यानंतर पावसाची संततधार सुरुच आहे.