अमरावती - अमरावती जिल्ह्यातील काही तालुक्यात काल दुपारी अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी, चांदूर बाजार, अचलपूर, तिवसा तालुक्यामध्ये कडाक्याच्या विजेसह जोरदार पाऊस झाला. अचानक आलेल्या पावसामुळे अनेकांची तारांबळ उडाली. चांदुर बाजार तालुक्यात वीज पडून एका मजुरांचा मृत्यू झाला. कांदा, गहू,केळी, पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
अमरावती जिल्ह्यात अवकाळी पावसाचा कहर; वीज पडून एकाचा मृत्यू - deathe
चांदुर बाजारही मध्ये अवकाळी पावसाचा जोरदार झटका बसला यामुळे गहू,कांदा, केळी,संत्रा या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.
![अमरावती जिल्ह्यात अवकाळी पावसाचा कहर; वीज पडून एकाचा मृत्यू](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/images/768-512-3027532-thumbnail-3x2-ahmednagar.jpg)
काल दुपारपासून वातावरणात अचानक बदल झाला, सोसाट्याचा वारा वादळाने काही घरांची पडझड झाली, असून तिवसा तालुक्यातील एका घराची भिंत पडल्याने एक महिला किरकोळ जखमी झाली. चांदुर बाजारही मध्ये अवकाळी पावसाचा जोरदार झटका बसला यामुळे गहू,कांदा, केळी,संत्रा या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. बेलोरा येथे शेत शिवारात वीज पडून मधू गोविंद गयने (वय ४२ रा. मध्यप्रदेश) या तरुणाचा रात्री 9 च्या दरम्यान विज पडून मृत्यू झाला. हा तरूण गुरे चारण्यासाठी महाराष्ट्रात आला होता. वीज पडून त्याचा एका शेतातच दुर्दैवाने मृत्यू झाला, रात्री अमरावती शहरासह, तिवसा, चांदुरबाजार तालुक्याला अवकाळी पावसाचा तडाखा बसला यात सर्वाधिक चांदुरबाजार व तिवसा तालुक्याला फटका बसला आहे .जिल्ह्यातील शेकडो हेक्टर वर झालेल्या शेतमालाच्या नुकसानाने शेतकरी पुन्हा हवालदिल झाला आहे.