महाराष्ट्र

maharashtra

अमरावतीत मान्सूनपूर्व पावसाची हजेरी; बाजार समितीतील शेकडो क्विंटल शेतमाल भिजला

By

Published : Jun 10, 2021, 8:08 PM IST

सध्या पेरणीचा हंगाम तोंडावर आहे. त्यामुळे बियाणे खरेदीसाठी पैसे हवे म्हणून शेतकरी आपला शेतमाल कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विकण्यासाठी आणत आहे. अशातच आज आलेल्या अवकाळी पावसामुळे हा शेतमाल भिजला. या तूर, सोयाबीन, हरभरा आदी शेतमालाचा समावेश आहे. शेतमाल पावसामुळे भिजल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून आता पेरणी कशी करायची या विवंचनेत शेतकरी आहे.

अमरावती -हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार मागील दोन ते तीन दिवसांपासून अमरावती जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर मान्सूनपूर्व पाऊस सुरू आहे. आज (गुरुवार) दुपारच्या सुमारास देखील अचानक पाऊस आल्याने अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीतील शेकडो क्विंटल शेतमाल पाण्याने भिजला. त्यामुळे शेतकऱ्यांना व व्यापाऱ्यांना पुन्हा एकदा जबर फटका बसला आहे.

सध्या पेरणीचा हंगाम तोंडावर आहे. त्यामुळे बियाणे खरेदीसाठी पैसे हवे म्हणून शेतकरी आपला शेतमाल कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विकण्यासाठी आणत आहे. अशातच आज आलेल्या अवकाळी पावसामुळे हा शेतमाल भिजला. या तूर, सोयाबीन, हरभरा आदी शेतमालाचा समावेश आहे. शेतमाल पावसामुळे भिजल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून आता पेरणी कशी करायची या विवंचनेत शेतकरी आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details