अमरावती- रविवारी सायंकाळी चार वाजल्यापासून वादळी वाऱ्यासह पावसाने जिल्ह्यातील काही तालुक्यात हजेरी लावली. यामुळे उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला. अनेक दिवसांपासून बळीराजा पावसाची वाट पाहत होता. अखेर मान्सून भारतात दाखल झाला असून काही दिवसात तो महाराष्ट्रतही हजेरी लावणार आहे.
अमरावती जिल्ह्यातील पाच तालुक्यात वरुणराजा बरसला; नागरिकांना दिलासा - MANSOON
जिल्ह्यातील भातकुली, चांदुर रेल्वे, तिवसा, चांदुर बाजार, धामनगाव रेल्वे येथे पावसाच्या सरी कोसळल्या.
अमरावती
अमरावती जिल्ह्यातील भातकुली, चांदुर रेल्वे, तिवसा, चांदुर बाजार, धामनगाव रेल्वे येथे पावसाच्या सरी कोसळल्या. या पावसामुळे जमिनीतील ऊष्णता कमी झाली आहे. पावसाचे आगमन झाल्याने आता शेतीतील कामांना वेग येणार आहे.