महाराष्ट्र

maharashtra

Heavy rain in Amravati : पिकांचे नुकसान! परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात आणले पाणी

By

Published : Oct 12, 2022, 6:44 PM IST

ऑक्टोबर महिन्यातही अमरावती जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस कोसळतो ( Heavy rain in Amravati ) आहे. आता दिवाळी जवळ आली असतानाही पाऊस थांबायचे नाव घेत नसल्याने या पावसाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी ( rain bring water to farmer eyes ) आणले.

rain
मुसळधार पाऊस

अमरावती :ऑक्टोबर महिन्यातही अमरावती जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस कोसळतो ( Heavy rain in Amravati ) आहे. आता दिवाळी जवळ आली असतानाही पाऊस थांबायचे नाव घेत नसल्याने या पावसाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी ( rain bring water to farmer eyes ) आणले.

अमरावती जिल्ह्यात मुसळधार

तूर, कापूस, सोयाबीन, मिरचीला फटका : यावर्षी तूर, कापूस, सोयाबीन, मिरची, यांचे चांगले उत्पादन आहे. या पिकांना बाजार भाव देखील चांगला असताना आता दसऱ्यापासून सतत पाऊस कोसळत असल्यामुळे या पिकांवर परिणाम झाल्याचे चित्र पाहायला मिळत ( Rainfall Effects On Crops ) आहे. जिल्ह्यातील अचलपूर चांदूरबाजार तिवसा धामणगाव रेल्वे दर्यापूर अंजनगाव सुर्जी या सर्व तालुक्यात मुसळधार पाऊस बरसात असल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत सध्या जिल्ह्यात संत्री तोडण्याचा हंगाम आहे तसेच कापूस आणि सोयाबीन सुद्धा दिवाळीपूर्वी काढण्यात येतात मात्र सतत बर असणाऱ्या अवकाळी पावसामुळे संत्र्यासह कापूस आणि सोयाबीन ची प्रतवारी खराब झाली आहे. सततच्या पावसामुळे तूर आणि ज्वारी या पिकांवर अळी पडण्याची चिंता शेतकऱ्यांना भेडसावत आहे.

शासनाने नुकसान भरपाई देण्याची मागणी : ऑक्टोबर महिन्यात पाऊस कोसळत असल्यामुळे आणि शेतात जाण्यासाठी भांडण रस्ते केले नसल्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतात जाणे कठीण झाले आहे. शेतात जे काही मात्र झाले ते नेण्यासाठी व्यापारी देखील सध्या शेतात येऊ शकत नाही यामुळे हा शेतमाल शेतातच खराब होण्याची शक्यता अधिक आहे. ऐन दिवाळीत शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले असून शासनाने शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांच्यावतीने केली जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details