अमरावती: हनुमान जयंती चैत्र महिन्यच्या पौर्णिमेला साजरी केली जाते. हनुमान जयंतीच्या दिवशी मारुतीची पूजा केली जाते. अमरावती शहरालगत असणाऱ्या श्री क्षेत्र चांगापूर येथील श्री हनुमान मंदिरात आज हनुमान जयंतीच्या पर्वावर पहाटे पाच वाजता श्री हनुमानाला पंचपक्वानांसह बुंदीच्या लाडूंचा भोग चढविला जातो. साडेपाच वाजता महाप्रसादाला सुरुवात झाली आहे. हा महाप्रसाद रात्री एक वाजेपर्यंत वितरित केला जातो. सुमारे 25 ते 30 हजार भाविक या महाप्रसादाचा लाभ घेतात. विशेष म्हणजे पहाटे साडेपाच वाजता महाप्रसाद घेण्यासाठी देखील मोठ्या संख्येने भाविक मंदिरात उपस्थित असतात.
पहाटे तीन वाजल्यापासून अभिषेक सोहळा: हनुमान जयंतीच्या पर्वावर आज पहाटे तीन वाजल्यापासून चांगापूर येथील हनुमान मंदिरात श्री हनुमान आला अभिषेक चढविण्यास सुरुवात झाली. दूध, दही, मध, पाणी, साखर अशा पंचामृतासह श्री हनुमंताला अभिषेक चढविण्यात आला. साडेचार वाजता हनुमान चालीसा पठण आणि पाच वाजता हनुमानाची आरती मंदिरात करण्यात आली. अभिषेक सोहळा आणि आरतीला पाचशेच्यावर भाविक मंदिरात पोहोचले होते.