अमरावती -हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार काल विदर्भात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा परिसरातही गारपीटीने मोठे नुकसान झाले असतानाच आज पुन्हा एकदा मेळघाटातील काटकुंभ परिसरातील काटकुंभ, डोमा, बामादेही, कोयलारी, बगदरी, काजलडोह सह अनेक गावात तुफान गारपीट झाली आहे. त्यामुळे गावात अक्षरशः गारीचा खच पडला होता. तर या अवकाळी पाऊस आणि गारपीटमुळे पिकाला जबर फटका बसला असून, गहु, हरबरा आणि मक्याचे मोठे नुकसान झाले आहे. पुढील 24 तारखेपर्यत ढगाळ वातावरण राहणार असल्याचा अंदाजही हवामान विभागाने वर्तविला आहे.
हेही वाचा -पाच फोन कॉल, हिरेन- वाझे भेट अन दहा मिनिटांची चर्चा; एनआयएच्या हाती महत्वाचा पुरावा