अमरावती -मागील चार दिवसांपासून जिल्ह्यात अवकाळी पावसासह तुफान गारपीट झाली.मेळघाटातील लवादा परिसरात गारपिटीमुळे जणू काश्मीरचे स्वरूप आले होते. अचानक आलेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे शेतकऱ्यांचे रब्बी हंगामातील पीकांचे नुकसान झाले आहे. मेळघाटमधील मका, गहू या पिकांना पावसाचा फटका बसला आहे.
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार अमरावती जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून अवकाळी पाऊस आणि गारपीट सुरू आहे.या अवकाळी पावसाचा मोठा फटका जिल्ह्यातील तब्बल ९ तालुक्यांना बसला आहे.या पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांचे छप्पर उडून गेले आहे. यामुळे संत्राच्या बागा उध्वस्त झाल्या आहे.तसेच काढणीला आलेला कांदा आणि गहू सुद्धा खराब झाला आहे.