अमरावती - कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पान, गुटखा यासारखे पदार्थ खाऊन थुंकण्यावर बंदी घालण्यात आली आहे. मात्र, अमरावतीच्या जिल्हा उपनिबंधक कार्यालयातूनच गुटखा विक्री सुरू असल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात अन्न व औषध प्रशासनाने एका व्यक्तीला ताब्यात घेतले आहे.
अमरावती जिल्हा उपनिबंधक कार्यालयातून गुटखा विक्री, अन्न व औषधी प्रशासन विभागाची कारवाई - अधिकारी राजेश यादव
अमरावतीच्या जिल्हा उपनिबंधक कार्यालयातूनच गुटखा विक्री सुरू असल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील एका खोलीतून गुटखा विक्री केली जात असल्याची माहिती अन्न व औषध विभागाला मिळाली. बुधवारी सायंकाळी अन्न व औषधी प्रशासनाचे अधिकारी राजेश यादव यांनी जिल्हा उपनिबंधक कार्यालयात धाड टाकली.
जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील एका खोलीतून गुटखा विक्री केली जात असल्याची माहिती अन्न व औषध विभागाला मिळाली. बुधवारी सायंकाळी अन्न व औषधी प्रशासनाचे अधिकारी राजेश यादव यांनी जिल्हा उपनिबंधक कार्यालयात धाड टाकली. याबाबत गाडगेनगर पोलिसांनाही माहिती देण्यात आली.
कारवाई दरम्यान उपजिल्हा निबंधक कार्यालयाची झडती घेतली असता कार्यालयाच्या अखेरीस असणाऱ्या एका बंद खोलीत विविध प्रकारच्या गुटख्याचा साठा आढळून आला. कोरोनामुळे सर्व बंद असताना परिसरातील पान टपरी चालकाने जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी साटेलोटेकरून याठिकाणी गुटखा साठवल्याचे बोलले जात आहे. संबंधित पानटपरी चालकास अटक करण्यात आली असून सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.