अमरावती- अचलपूर पोलिसांनी शहरात दोन लाखाचा गुटखा पकडला आहे. प्रकरणी दोघांना अटक केली आहे. अचलपूरमधील दिलदारपुरा येथील रहिवासी पंकज गायगोले याच्या घरातून विविध प्रकारचा १ लाख ७४ हजार २०० रुपयांचा गुटखा पोलिसांनी जप्त केला आहे.
अचलपुरात २ लाखाचा गुटखा जप्त, दोघांना अटक - अचलपूरमधील दिलदार पुरा
अचलपूरमधील दिलदारपुरा येथील रहिवासी पंकज गायगोले याच्या घरातून विविध प्रकारचा १ लाख ७४ हजार २०० रुपयांचा गुटखा पोलिसांनी जप्त केला आहे. याशिवाय प्रदीप माहोरे याच्या घरातूनही २७ हजाराचा गुटखा जप्त केला गेला आहे.
अचलपूरात २ लाखाचा गुटखा जप्त
याशिवाय प्रदीप माहोरे याच्या घरातूनही २७ हजाराचा गुटखा जप्त केला गेला आहे. यात अचलपूर पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले असून दोन स्वतंत्र गुन्हे नोंदविले आहेत. लॉकडाऊनच्या काळातही गुटखा तस्करी मोठ्या प्रमाणात होत असल्याने सामान्य नागरिक अनेक शंका व्यक्त करत आहेत.