महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गुरुदेव भक्तांनी वाहिली राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना मौन श्रद्धांजली - अमरावती ताज्या बातम्या

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५२व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त गुरुकुंज मोझरी येथे मोजक्याच गुरूदेव भक्तांच्या उपस्थित श्रद्धांजली महोत्सव पार पडला.

gurudev-bhakt-paid-tribute-to-rashtrasant-tukadoji-maharaj
गुरुदेव भक्तांनी वाहिली राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना मौन श्रद्धांजली

By

Published : Nov 5, 2020, 7:10 PM IST

अमरावती -अखिल विश्वाला मानवतेचा संदेश देणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५२व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त आज त्यांची कर्मभूमी असलेल्या गुरुकुंज मोझरीत मोजक्याच गुरूदेव भक्तांच्या उपस्थित ४ वाजून ५८ मिनिटांनी दोन मिनिटे स्तब्ध होऊन त्यांना मौन श्रद्धांजली वाहण्यात आली.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना मौन श्रद्धांजली वाहण्यात आली.

दरवर्षी मौन श्रद्धांजलीचा हा हृदस्पर्शी कार्यक्रम महासमाधीवर पार पडत असतो; परंतु यंदा मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम प्रार्थना मंदिरासमोर पार पडला. तुकडोजी महाराजांना श्रद्धांजली देताना गुरुकुंज मोझरीत निरव शांतता पसरली होती. या महोत्सवात योग गुरू रामदेव बाबा यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे हजेरी लावली होती. तर राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी देखील गुरुकुंजात हजेरी लावून तुकडोजी महाराजांनी मौन श्रद्धांजली वाहिली.


राष्ट्रसंतांसह सैनिक आणि कोरोनायोद्धांनाही श्रद्धांजली

दरवर्षी या पुण्यतिथी महोत्सवाला देशभरातून लाखो गुरुदेव भक्त येत असतात. परंतु कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता सरकारच्या आदेशाचे पालन करून लाखो गुरुदेव भक्तांनी तुकडोजी महाराजांना घरूनच मौन श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी देशासाठी शाहिद होणाऱ्या सैनिकांबरोबर कोरोना काळात कोरोनायोध्दा म्हणून कर्तव्य बजावताना मरण आलेल्या कोरोनायोद्धांना देखील यावेळी श्रद्धांजली देण्यात आली. या मौन श्रद्धांजली नंतर हिंदू, मुस्लीम, बौद्ध, पारशी, जैन, ख्रिश्चन आदी सर्व धर्माच्या प्रार्थना घेण्यात आल्या. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी 'ग्रामगीता' हा ग्रंथ लिहून त्या माध्यमातून दिलेली समता, बंधुता, राष्ट्रीय एकात्मता आणि सर्वधर्मसमभावाची शिकवण समाजाला आजही प्रेरणादायी आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details