महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अमरावतीत गुरुनानक जयंती उत्साहात साजरी; शेकडो भाविक गुरद्वारात झाले नतमस्तक - Guru Nanak 551 birth anniversary

शीख धर्माचे पहिले गुरू गुरुनानक यांची जयंती अमरावती शहरात उत्साहात साजरी केली जात आहे. शहरातील बुटी प्लॉट येथील गुरद्वारात गुरुनानक यांची 551वी जयंती, अर्थात प्रकाशपर्वनिमित्त शिखांसाह विविध जाती धर्मातील शेकडो भाविकांनी गुरद्वारात डोके टेकवून गुरुनानक यांचे स्मरण केले.

Guru Nanak 551 birth anniversary Amravati
अमरावतीत गुरुनानक जयंती उत्साहात साजरी

By

Published : Nov 30, 2020, 7:16 PM IST

अमरावती - शीख धर्माचे पहिले गुरू गुरुनानक यांची जयंती अमरावती शहरात उत्साहात साजरी केली जात आहे. शहरातील बुटी प्लॉट येथील गुरद्वारात गुरुनानक यांची 551वी जयंती, अर्थात प्रकाशपर्वनिमित्त शिखांसाह विविध जाती धर्मातील शेकडो भाविकांनी गुरद्वारात डोके टेकवून गुरुनानक यांचे स्मरण केले.

माहिती देताना बुटी प्लॉट गुरुद्वारा समितीचे अध्यक्ष सरदार राजेंद्रसिंह सलूजा

कोरोनाच्या पर्श्वभूमीवर शासनाने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार सर्व काळजी घेण्यात आली असल्याची माहिती गुरुद्वारा मंडळाचे अध्यक्ष सरदार राजेंद्रसिंह सलुजा यांनी दिली.

गुरुद्वाराच्या प्रवेशद्वारावर सॅनिटायझेशन

गुरुद्वारात येणाऱ्या प्रत्येक भाविकांचे निर्जंतुकीकरण व्हावे, यासाठी गुरुद्वाराच्या प्रवेशद्वारासमोर सॅनिटायझर कक्ष उभारण्यात आले. या कक्षातून भाविकांवर सॅनिटायझर फवारणी झाल्यावरच त्यांना गुरुद्वारात प्रवेश देण्यात आला. गुरुद्वारात येणाऱ्या भाविकांना तूप आणि सोजीचा शिरा, तसेच बुंदीच्या लाडूंचा प्रसाद वितरित करण्यात आला.

महाप्रसाद रद्द

गुरुनानक जयंतीनिमित्त दरवर्षी गुरुद्वारा परिसरात महाप्रसादाचे वितरण होते. यावर्षी कोरोनामुळे गुरुद्वारा कमिटीने महाप्रसाद टाळला असून, येणाऱ्या प्रत्येक भाविकाला शिऱ्याचा प्रसाद वितरित केला. तसेच, गुरद्वारात येणाऱ्या प्रत्येक भविकांचे पादत्राणे हाताने घेऊन ते व्यवस्थित ठेवणे, आणि गुरुद्वारातून दर्शन घेऊन येणाऱ्या प्रत्येक भाविकाला त्याचे पादत्राणे हाताने देणे ही जबाबदारी अनेक युवकांनी सांभाळली. शीख धर्मात गुरुद्वारात येणाऱ्या भाविकांची पादत्राणे सभाळण्याला अनन्यसाधारण महत्व आहे.

हेही वाचा -अन्यथा दुचाकीने दिल्लीत जाऊन आंदोलन करणार; बच्चू कडूंचा इशारा

ABOUT THE AUTHOR

...view details