अमरावती : गुणरत्न सदावर्ते यांनी एसटी कामगारांचा संप चुकीच्या पद्धतीने हाताळला. विलीनकरणाची सोपी असलेली लढाई चुकीच्या पद्धतीने हाताळून कठीण करून ठेवली. एवढेच नव्हे तर, त्यामध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणात राजकारण केले. सदावर्ते यांनी आमच्या भावनांचा शांत डोक्याने खून केला असल्याचा आरोप महाराष्ट्र एस.टी.कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी अमरावतीत पत्रकार परिषदेत केला.
एसटी कर्मचारी संघटनेची खंत : बोलताना ते पुढे म्हणाले की, राज्य परिवहन महामंडळ हे आशिया खंडातील मोठे महामंडळ आहे. परंतु या महामंडळाचे खाजगीकरण करण्याचा घाट राज्य सरकारने घालत आहे. राज्य सरकारच्या चुकीच्या निर्णयामुळे महामंडळ प्रचंड अडचणीत आले आहे. लाल परीला ग्रहण लागले आहे. चुकीच्या नेतृत्वामुळे एसटी महामंडळावर हा संप लादला गेला असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
गुणरत्न सदावर्ते केला खून :गुणरत्न सदावर्ते यांनी एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांची दिशाभूल केली. एका राजकीय पक्षाने त्यांना या कामासाठी मुद्दामहून आयात केले होते. आमच्या संघटनेत, कर्मचाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात फूट पाळण्याचे प्रयत्न सदावर्ते यांनी केले. त्यांनी आमचा शांत डोक्याने खूनच केला असा आरोपही शिंदे यांनी यावेळी केला.