अमरावती - पावसामुळे भरलेल्या तालावाच्या काठावर खेकडे शोधण्यासाठी छोटासा खड्डा काडताना त्या खड्ड्यातून खेकड्याऐवजी चक्क बंदूक हाती लागल्याने मेळघाटातील मांडवा गावात खळबळ उडाली. ही बंदूक नेमकी कुणाची आणि ही तलावाच्या काठावर खड्ड्यात कोणी ठेवली याबाबत विवध चर्चांना उधाण आले आहे.
तलावाकाठी खेकड्याऐवजी हाती लागली बंदूक - district
क्रशरलगतचा तलाव पावसामुळे भरला असल्याने प्रेमराज एका मित्रासोबत बुधवारी तलावाकाठी खेकडे पकडायला गेला होता. खेकडा शोधण्यासाठी चिखलाच्या ठिकाणी प्रेमराज याने खड्डा खोदला. त्या खंड्यात चक्क बंदूक लागल्याने तो घाबरला. चिखलात सापडलेली बंदूक घेऊन प्रेमराजने थेट धारणी पोलीस ठाणे गाठले.
धारणी पासून अवघ्या काही अंतरावर मांडवा हे गाव आहे. मांडवा गावातील गिट्टी स्टोन क्रशरवर प्रेमराज भीमराव भटकर हा काही दिवसांपासून ऑपरेटर म्हणून काम करतो. दोन दिवस सलग कोसळलेल्या पावसामुळे आज क्रशरचे काम बंद होते. त्यामुळे क्रशरलगतचा तलाव पावसामुळे भरला असल्याने प्रेमराज एका मित्रासोबत बुधवारी तलावाकाठी खेकडे पकडायला गेला होता. खेकडा शोधण्यासाठी चिखलाच्या ठिकाणी प्रेमराज याने खड्डा खोदला. त्या खंड्यात चक्क बंदूक लागल्याने तो घाबरला. चिखलात सापडलेली बंदूक घेऊन प्रेमराजने थेट धारणी पोलीस ठाणे गाठले.
धारणी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक रविकिरण खंडारे यांनी प्रेमराज भटकरकडून फिर्याद नोंदवून मांडवा गावात बंदूक जिथे सापडली त्या तलाव परिसराची पाहणी केली. ही बंदूक तलावाच्या काठी कोणी ठेवली असावी. कुठे काही घातपात घडवून कोणी तलावाकाठी बंदूक लपवून ठेवली तर नही ना अशा विविध चर्चांना मांडवा गावात उधाण आले आहे.