अमरावती -ग्रामीण भागात अवैध दारू विक्री, गुटखा, वाळू तस्करी मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. या सर्व प्रकारासोबतच महिलांवरील अत्याचार थांबले पाहिजेत. त्यासाठी शहर आणि ग्रामीण भागात पोलिसांचा धाक असणे गरजेचे आहे. तसेच जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहणे गरजेचे असल्याचे सांगत त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे, असा दम पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी पोलिसांना दिला.
जिल्ह्यात कायदा व सुव्यस्था अबाधित ठेवा... यशोमती ठाकुरांनी पोलिसांना भरला दम - कायदा, सुव्यवस्था अमरावती यशोमती ठाकूर
पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी अमरावती जिल्हा ग्रामीण व शहर पोलीस अधिकाऱ्यांची कायदा व सुव्यवस्थाबाबत आढावा बैठक घेतली होती. यावेळी त्या बोलत होत्या. ग्रामीणसह शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलिसांचा धाक असला पाहिजे. त्याचबरोबर शहरातील वाहतूक व्यवस्था ही विस्कळीत न होता कायम असली पाहिजे, असेही ठाकूर यांनी सांगितले.
पालकमंत्री यशोमती ठाकूर
पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी अमरावती जिल्हा ग्रामीण व शहर पोलीस अधिकाऱ्यांची कायदा व सुव्यवस्थाबाबत आढावा बैठक घेतली होती. यावेळी त्या बोलत होत्या.
ग्रामीणसह शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलिसांचा धाक असला पाहिजे. त्याचबरोबर शहरातील वाहतूक व्यवस्था ही विस्कळीत न होता कायम असली पाहिजे, असेही ठाकूर यांनी सांगितले. या बैठकीत सर्वच विभागाचे पोलीस अधिकारी उपस्थित होते.