महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पालकमंत्री यशोमती ठाकुरांकडून मेळघाटातील 'त्या' आदिवासी तरुणांना स्पर्धा परीक्षेचे पुस्तके भेट - ईटीव्ही भारत इम्पॅक्ट बातमी

चिखलदरा तालुक्यातील 35 आदिवासी तरुण हे सैन्य भरतीची तयारी करत होते. मात्र, त्यांच्याकडे पुस्तके नव्हती. त्यांना पुस्तकांची गरज असल्याचे 'ईटीव्ही भारत'ने बातमीच्या माध्यमातून समोर आणले होते. याची दखल घेत पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी स्पर्धा परिक्षेची सुमारे 50 पुस्तके त्या तरुणांचा मुलगी आकांक्षा ठाकूरच्या मार्फत भेट दिले आहेत.

books distribution
books distribution

By

Published : Aug 3, 2020, 3:41 PM IST

अमरावती - लॉकडाऊनच्या काळात सुट्टीला आलेले अमरावती जिल्ह्यातील शेंदोळा खुर्द येथील भारतीय सैनिक सुधीर वानखडे हे मागील तीन महिन्यांपासून मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील बोराळासह 6 गावातील 35 आदिवासी तरूणांना मोफत सैन्य भरतीचे धडे देत आहेत. पण, या आदिवासी तरुणांना पुस्तके व वाचनालय उपलब्ध व्हावीत, अशी या विद्यार्थ्यांची मागणी होती. या संदर्भात मोफत प्रशिक्षण देणाऱ्या सुधीर वानखडे यांची यशोगाथा व आदिवासी तरुणांची पुस्तकाची मागणी 'ईटीव्ही भारत'ने बातमीच्या माध्यमातून मांडली होती. त्यानंतर त्याची दखल अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी घेतली आहे. त्यांनी 50 स्पर्धा परीक्षेचे पुस्तके हे या तरुणांना रक्षाबंधन निमित्ताने मुलगी आकांक्षा ठाकूर हिच्या मार्फत सोमवारी (दि. 3 ऑगस्ट) भेट दिले आहे. यावेळी आकांशा ठाकूर हिने आदिवासी तरुणांना राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा केला.


अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील शेंदोळा खुर्द येथील सुधीर वानखडे हे भारतीय सैन्यात आहे. पंजाब राज्यात ते आपले कर्तव्य बजावत असतात. पण, लॉकडाऊन दरम्यान ते त्यांच्या मूळ गावी आले होते. त्यांची पत्नी ही मेळघाटातील चिखलधारा तालुक्यातील बोराळा गावात आरोग्य सेविका म्हणून कार्यरत आहे. त्यामुळे सुट्टी कुटुंबासोबत घालवण्यासाठी सुधीर वानखडे हे तिथे गेले होते. त्याच दरम्यान काही गावातील तरुणांशी ओळख झाल्यानंतर त्यांना मोफत सैन्य भरतीचे धडे देण्याचा निश्चय त्यांनी केला. मागील तीन महिन्यापासून ते मेळघाटातील सहा गावातील तरुणांना मोफत सैन्याचे धडे देत आहे. पण, मुलांना मात्र अभ्यासासाठी पुस्तके नव्हती. दरम्यान, या मुलांची मागणी ही ‘ईटीव्ही भारत’ने बातमीच्या माध्यमातून समाजापुढे मांडल्यानंतर या बातमीची दखल राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी घेतली. त्यानंतर स्पर्धा परिक्षेची 50 पुस्तके मुलगी आकांक्षा ठाकूर हिच्या मार्फत त्यांच्यापर्यंत पोहोचविले. दरम्यान, या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी लागणारे वाचनालय हे आता येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत तयार केले जाणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details