महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आंध्र प्रदेशात अडकलेल्या शेगोकार कुटुंबांची मंत्री यशोमती ठाकुर यांनी केली मदत - मालकमंत्री यशोमती ठाकूर बातमी

तिरुपती येथे दर्शनाला गेलेले अमरावतीत राहणारे शेगोकार कुटुंबीय तिथे होणाऱ्या मुसळधार पावासामुळे अडचणीत आले. परराज्यात अडकलेल्या 11 जणांच्या या कुटुंबांसाठी अमरावतीच्या पालकमंत्री अॅड. यशोमती ठाकूर यांनी आंध्रप्रदेशात काँग्रेस कार्यकर्त्यांमार्फत कुटुबांची तात्पुरती व्यवस्था करतच त्यांना अमरावतीत ही सुखरुप आणण्यास मदत केली.

छायाचित्र
छायाचित्र

By

Published : Nov 23, 2021, 7:46 PM IST

अमरावती- तिरुपती येथे दर्शनाला गेलेले अमरावतीत राहणारे शेगोकार कुटुंबीय तिथे होणाऱ्या मुसळधार पावासामुळे अडचणीत आले. परराज्यात अडकलेल्या 11 जणांच्या या कुटुंबांसाठी अमरावतीच्या पालकमंत्री अॅड. यशोमती ठाकूर यांनी आंध्रप्रदेशात काँग्रेस कार्यकर्त्यांमार्फत कुटुबांची तात्पुरती व्यवस्था करतच त्यांना विमानाने अमरावतीत ही सुखरुप आणण्यास मदत केली. तिरुपतीचा आशिर्वाद होता आणि यशोमती ठाकूर या देवदूतासारख्या धावून आल्या म्हणून आज सुखरुप आहोत, अशी भावना प्रवीण शेगोकारांनी व्यक्त केली आहे.

पुण्यातील विमानतळातून बोलताना भाविक

अमरावतीतील प्रवीण शेगोकार आणि त्यांचे सह 11 जणांचे कुटुंब आंध्र प्रदेशात तिरुपती येथे देवदर्शनाला गेले होते. तिरुपती बालाजीचे दर्शन झाले. मात्र, परतीच्या वेळी मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा त्यांना फटका बसला. तेथील जनजीवन विस्कळित झाल्याने भोजन, निवासाची सोय उपलब्ध होत नव्हती. बस, रेल्वे सेवाही बंद असल्याने हे कुटुंब गुडूरमध्ये अडकले. काही स्थानिक मंडळींनी लहान मुलांसह असलेल्या या कुटुंबाच्या गैरसोयीचा फायदा घेत खाण्याचे जिन्नस, रिक्षा प्रवास आदीत अव्वाच्या सव्वा भाव लावत लूटच केली. प्रवीण शेगोकारांनी स्थानिक प्रशासन, कंट्रोल रुम, जिल्हाधिकारी यांना मदत मागितली. मात्र, कुणीच वेळेत सहकार्य न केल्याने कुटुंब हवालदिल झाले होते.

पालकमंत्री अॅड यशोमती ठाकूर यांना संपर्क साधला, त्यांना परिस्थितीची, सोबत असणाऱ्या लहान मुलं व ज्येष्ठ नागरिकांची कल्पना दिली. पालकमंत्र्यांनी फोनवर धीर देत सुखरुप अमरावतीत परत आणेन, असा शब्द दिला. त्यानंतर त्यांना तातडीने अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सचिव बी.एम. संदीप यांना फोन केला. त्यांनी आंध्र प्रदेश काँग्रेसचे पदाधिकारी सी.एम. मेयप्पन यांच्या मदतीने स्थानिक काँग्रेस कार्यकर्ता किरण कुमार यांना प्रत्यक्ष शेगोकार कुटुंबांच्या मदतीसाठी पाठवले. कुटुंबाला भोजन, निवास अशी सर्व मदत देण्याची व्यवस्था किरण कुमार यांनी केली. परराज्यात विश्वासू मदत, धीर मिळाल्याने कुटुंब ही आश्वस्त झाले. दरम्यान, गुडूर ते चेन्नई अशा सुरक्षित प्रवासाची व्यवस्था केली. चेन्नई ते पुणे व पुणे ते नागपूर, अशी विमान प्रवासाची 11 जणांची सर्व व्यवस्था ही पालकमंत्र्यांनी केली, अशी माहिती प्रवीण शेगोकार यांनी दिली.

हे ही वाचा -Farm laws repealed : मोदींची हुकूमशाही शेतकऱ्यांच्या एकजुटीने मोडली - कडू

ABOUT THE AUTHOR

...view details