अमरावती -घरात लग्नाची तयारी सुरू होती... चार-दोन पाहुणेही आले होते... पुढील काही तासातच हळदही लागणार होती. मात्र, नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते. बोहल्यावर चढण्याअगोदरच नवऱ्या मुलाला हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि संसाराचा डाव मांडण्याअगोदरच मोडला. अचलपूर तालुक्यातील भिलोना गावात ही दुर्दैवी घटना घडली. आहे. सागर अण्णासाहेब साबळे असे मृत्यू झालेल्या तरूणाचे नाव आहे.
नियतीचा वार; हळदी समारंभाच्या दिवशीच झाला नवरदेवाचा मृत्यू - भिलोना नवरदेव मृत्यू
सागर साबळे हा २९ वर्षीय तरूण ठाणे येथे परिवहन विभागात चालक पदावर कार्यरत होता. सोमवारी त्याचा अमरावती येथील एका तरुणीशी विवाह होणार होता. मात्र, हळदी समारंभाच्या अगोदरच त्याला हृदय विकाराचा तीव्र झटका आला आणि त्याचे निधन झाले.

मृत सागर
सागर साबळे हा २९ वर्षीय तरूण ठाणे येथे परिवहन विभागात चालक पदावर कार्यरत होता. सोमवारी त्याचा अमरावती येथील एका तरुणीशी विवाह होणार होता. मात्र, हळदी समारंभाच्या अगोदरच त्याला हृदय विकाराचा तीव्र झटका आला. सागरच्या आई-वडिलांचेही काही वर्षांपूर्वी निधन झाले आहे. या प्रकारामुळे भिलोना गावात हळहळ व्यक्त होत आहे.