ETV Bharat Maharashtra

महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अमरावतीत पोलीस बंदोबस्तात अनुयायांनी केले महामानवाला अभिवादन - महामानवाला अभिवादन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासठी पहाटेपासून अनुयायी इर्विन चौक येथे दाखल झाले होते. पुतळ्यापर्यंत जाण्यास पोलिसांनी परवानगी दिली नसल्याने पुतळा परिसरात उभारण्यात आलेल्या बॅरिकेड्सला अनुयायांनी हार वाहून बाबासाहेबांना अभिवादन केले.

महामानव
महामानव
author img

By

Published : Apr 14, 2021, 3:28 PM IST

Updated : Apr 14, 2021, 3:35 PM IST

अमरावती -कोरोनाच्या सावटात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130व्या जयंतीनिमित्त इर्विन चौक येथिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी अनुयायांनी सकाळपासून दाखल झाले होते. दरम्यान पुतळा परिसरात पोलिसांनी बॅरिगेड्स लावल्याने अनुयायांनी दुरूनच महामानवाला अभिवादन केले. दरम्यान काहींनी आम्हाला पुतळ्याला हार घालून अभिवादन करायचे आहे. यासाठी वाद घातल्यावर पोलीस बंदोबस्तात शिस्तीने प्रत्येकाला पुतळ्याला हार वाहून अभिवादन करण्याची संधी देण्यात आली.


बॅरिकेड्सला वाहिले हार
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासठी पहाटेपासून अनुयायी इर्विन चौक येथे दाखल झाले होते. पुतळ्यापर्यंत जाण्यास पोलिसांनी परवानगी दिली नसल्याने पुतळा परिसरात उभारण्यात आलेल्या बॅरिकेड्सला अनुयायांनी हार वाहून बाबासाहेबांना अभिवादन केले.

महामानवाला अभिवादन
पोलिसांनी दिली परवानगीडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी पुतळ्यापर्यंत जाऊ देण्याबाबत काही अनुयायांनी पोलिसांशी वाद घातला होता. इर्विन चौक येथे पोहोचलेले पोलीस उपायुक्त शशिकांत सातव यांनी संतप्त अनुयायांची समजूत काढली. यानंतर सर्व अनुयायांना रांगेत प्रत्येकी एक एक करून अभिवादन करण्याची परवानगी दिली.पालकमंत्र्यांनी केले अभिवादनजिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी इर्विन चौक येथे पोचून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार वाहून अभिवादन केले. पुढच्यावर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती धुमधडाक्यात साजरी करण्यासाठी यावर्षी घरी राहूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करा, असे आवाहन ठाकूर यांनी यावेळी केले आहे.हेही वाचा-'उसेन बोल्ट'लाही मागे टाकतात कर्नाटकचे श्रीनिवास गौडा!
Last Updated : Apr 14, 2021, 3:35 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details