धामणगाव रेल्वे शहरात ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त भव्य शोभायात्रा; शांती,अमनचा दिला संदेश - Eid-e-Miladunnabi Dhamnagaon railway
जिल्ह्यातील धामणगाव शहरात ईद-ए-मिलादुन्नबीच्या पर्वावर मुस्लिम बांधवांकांडून भव्य व शानदार जुलूस काढण्यात आले. या जुलुसाच्या माध्यमातून मुस्लिम बांधवांनी सर्व शहरवासीयांना शांती व अमनचा संदेश दिला.

धामणगाव रेल्वे शहर ईद-ए-मिलादुन्नबी जुलूस दृश्य
अमरावती- जिल्ह्यातील धामणगाव शहरात ईद-ए-मिलादुन्नबीच्या पर्वावर मुस्लिम बांधवांकांडून भव्य व शानदार जुलूस काढण्यात आले. या जुलुसाच्या माध्यमातून मुस्लिम बांधवांनी सर्व शहरवासीयांना शांती व अमनचा संदेश दिला. उत्साहात काढण्यात आलेल्या जुलुसात लहान मुले विशेष पोशाखात वेगवेगळ्या प्रकारचे साफे बांधून सहभागी झाले होते. एवढेच नव्हे तर, जुलूसमध्ये तोफांच्या माध्यमातून फुलांचा वर्षाव करण्यात आला. या दरम्यान सर्व मुख्य चौकात शरबत, मिठाईचे वाटप करण्यात आले.
ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त प्रतिक्रिया देताना नागरिक