महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

घुईखेड ग्रामपंचायतीची दुर्दशा... कार्यालयात छत्री घेऊन सचिवांचे काम - अमरावती बातमी

चांदूर रेल्वे तालुक्यातील घुईखेड गावाचे २००८ मध्ये पुनर्वसन झाले. मात्र येथील समस्या अजुनही कायमच आहेत. घुईखेड ग्रामपंचायत कार्यालयासाठी बेंबळा प्रकल्प विभागाकडून अद्यापही भुखंड मिळाला नाही. बांधकामाकरिता पैसेही मिळालेले नाहीत.

gram-panchayat-secretarys-work-with-an-umbrella-in-ghuikhed-amravati
कार्यालयात छत्री घेऊन सचिवांचे काम

By

Published : Jul 24, 2020, 1:16 PM IST

अमरावती- चांदूर रेल्वे तालुक्यातील घुईखेड येथील ग्रामपंचायतीची दुर्दशा झाली आहे. पावसाळ्यात कार्यालयाच्या छतातून पावसाचे पाणी गळत आहे. अशा परिस्थितील ग्रामपंचायतीचे सचिव आपले कर्तव्य पार पाडत आहेत. छत्री घेऊन ते कार्यालयात काम करत आहेत. घुईखेड ग्रामपंचायतीला नवीन पुनर्वसनामध्ये अद्यापही जागा, वा बांधकामासाठी पैसा मिळाला नाही. त्यामुळे येथील सचिवांना छत्री घेऊन काम करावे लागत आहे.

कार्यालयात छत्री घेऊन सचिवांचे काम

चांदूर रेल्वे तालुक्यातील घुईखेड गावाचे २००८ मध्ये पुनर्वसन झाले. मात्र येथील समस्या अजुनही कायमच आहेत. घुईखेड ग्रामपंचायत कार्यालयासाठी बेंबळा प्रकल्प विभागाकडून अद्यापही भुखंड मिळाला नाही. बांधकामाकरिता पैसेही मिळालेले नाहीत. त्यामुळे जुन्याच ग्रामपंचायतीच्या इमारतीमध्ये सध्या कामकाज सुरू आहे. परंतु, पावसाळ्यात छत गळत असल्यामुळे आता कर्मचाऱ्यांना येथे काम करणेही कठीण झाले आहे. ग्रामपंचायत सचिव संजय शिरसाठ कार्यालयात छत्री घेऊन काम करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details