महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Gram Panchayat Elections : ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच पदाकरिता 166 आणि सदस्य पदासाठी 3896 उमेदवार - 18 डिसेंबरला ग्रामपंचायत निवडणुक पार पडणार

ग्रामपंचायत निवडणुकीत (Gram Panchayat elections) सरपंच पदाकरिता 166 (166 candidates for post of Sarpanch) आणि सदस्य पदासाठी 3896 उमेदवार निवडणूक रिंगणात (3896 candidates for post of member) उभे आहेत.

Gram Panchayat Elections
ग्रामपंचायत निवडणुक

By

Published : Dec 10, 2022, 6:45 PM IST

अमरावती :जिल्ह्यातील ग्रामीण भागात ग्रामपंचायत (Gram Panchayat elections) निवडणुकीमुळे प्रत्येक गावात राजकीय रंग आता भरायला लागले आहे. एकूण 257 ग्रामपंचायतींसाठी 18 डिसेंबरला होणाऱ्या निवडणुकीत 267 सरपंच पदाकरिता (166 candidates for post of Sarpanch) एकूण 1 हजार सहा आणि 97 सदस्य पदांसाठी 3893 उमेदवार निवडणूक रिंगणात (3896 candidates for post of member) आहेत.


एकूण चार हजार 902 उमेदवार निवडणूक रिंगणात :जिल्ह्यातील एकूण सरपंच आणि 413 ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. त्यांची अधिकृत घोषणा ही निकालानंतर केली जाणार आहे. जिल्ह्यात 14 तालुक्यातील 257 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 28 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर पर्यंत सरपंच आणि सदस्य पदांसाठी नामनिर्देशन अर्ज स्वीकारण्यात आले. यामध्ये सरपंच पदासाठी 1287 आणि सदस्य करिता 4858 नामांकन दाखल झाले होते. त्यानंतर सरपंच पदाकरिता १०६ आणि सदस्यांची 3896 नामांकन वैध करण्यात आली. 60 डिसेंबरला नामांकन अर्ज मागे घेण्याच्या अखेरचा दिवस होता, यापैकी सरपंच पदाच्या 267 उमेदवारांनी तर सदस्य पदासाठी नामांकन भरलेल्या 526 उमेदवारांनी माघार घेतल्याने, आता सरपंच आणि सदस्य पदासाठी एकूण 4902 उमेदवार रिंगणात आहेत.



जिल्ह्यात दोन ग्रामपंचायत अभिरोध :अमरावती जिल्ह्यात असणाऱ्या 257 ग्रामपंचायतींपैकी दोन ग्रामपंचायत मध्ये सरपंचासह सर्व सदस्य बिनविरोध झाले आहेत. यामध्ये चांदुर रेल्वे तालुक्यातील सावंगी संगम आणि नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील चिखली वैद्य या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. त्यामुळे आता 18 डिसेंबरला 255 ग्रामपंचायतींमध्येच निवडणूक होणार आहे.



गाव खेड्यात निवडणुकीचे वारे :ग्रामीण भागात अतिशय महत्त्व असणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीचे वारे आता जिल्ह्यातील गाव खेड्यात व्हायला लागले आहे. उमेदवारांना गुरुवारीच निवडणूक चिन्हांचे वाटप झाले असून, 16 डिसेंबर पर्यंत या उमेदवारांना प्रचाराची मुभा देण्यात आली आहे.

राजकीय नेत्यांचे ग्रामीण भागाकडे लक्ष :ग्रामपंचायत निवडणुकीत विविध पॅनल एकमेकांविरोधात लढत असताना, जिल्ह्यातील सर्व आमदारांनी आपल्या मतदारसंघात येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीकडे आपले लक्ष केंद्रित केले आहे. वरुड आणि मोर्शी तालुक्यातील ग्रामपंचायत मध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याशी समर्पित पॅनल मध्ये काट्याची टक्कर होणार असल्याचे चित्र आहे. चांदुर रेल्वे आणि धामणगाव रेल्वे तालुक्यात भाजप आणि काँग्रेसचे वर्चस्व असणारे पॅनल एकमेकांविरोधात दंड थोपाटत आहेत. अचलपूर आणि चांदूर बाजार तालुक्यात काँग्रेस भाजप या राजकीय पक्षाच्या मर्जीतील पॅनल ची लढत आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाशी संबंधित गटां विरोधात आहे. एकूणच 20 डिसेंबरला ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यावर कुठल्या नेत्याचे आणि कुठल्या पक्षाचे वर्चस्व कोणत्या गावात आहे हे स्पष्ट होईल.

ABOUT THE AUTHOR

...view details