महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Nov 9, 2022, 10:34 PM IST

ETV Bharat / state

Gram Panchayat Election: जिल्ह्यातील 257 ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर; 18 ला मतदान, तर 20 डिसेंबरला मतमोजणी

Gram Panchayat Election: राज्य निवडणूक आयोगाने State Election Commission राज्यातील ७५५७ ग्रामपंचयतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून त्यानुसार जिल्ह्यातील 257 ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे.

Gram Panchayat Election
Gram Panchayat Election

अमरावती: राज्य निवडणूक आयोगाने State Election Commission राज्यातील ७५५७ ग्रामपंचयतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून त्यानुसार जिल्ह्यातील 257 ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे.

आदर्श आचारसंहिता लागूजाहीर झालेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार ऑक्टोबर 2022 ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायती, नव्याने स्थापित ग्रामपंचायती तसेच समर्पित आयोगाच्या अहवालात दिसत नसल्यामुळे मागील निवडणुकांमधून वगळलेल्या ग्रामपंचायतींच्या (सदस्य पदासह थेट सरपंच पदाच्या) सार्वत्रिक निवडणूकांसाठी संगणक प्रणालीव्दारे राबविण्याचा प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाव्दारे जाहीर करण्यात आला आहे. जिल्ह्यातील 257 ग्रामपंचायतींची निवडणूक होणार असून त्याअनुषंगाने आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.

निवडणूक कार्यक्रमाचा तपशील शुक्रवार दि. 18 नोव्हेंबरला तहसीलदार यांच्याव्दारे निवडणुकीची नोटीस प्रसिध्द केल्या जाईल. दि. 28 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर 2022 पर्यंत नामनिर्देशनपत्रे मागविणे व सादर करण्याचा कालावधी राहणार आहे. त्यासाठी सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंतची वेळ राहील. दि. 5 डिसेंबरला सकाळी 11 वाजेपासून छाननी संपेपर्यंत नामनिर्देशनपत्र छाननी केल्या जाईल.

निवडणूकीच्या निकालाची अधिसूचना प्रसिध्द दि. 7 डिसेंबरला दुपारी 3 वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्र मागे घेता येईल. तसेच दि. 7 डिसेंबरलाच दुपारी 3 वाजेनंतर निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक व वेळ राहील. दि. 18 डिसेंबरला सकाळी 7.30 वाजतापासून ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत मतदानाची तारीख राहील. दि. 20 डिसेंबर रोजी मतमोजणी व निकाल घोषित करण्याचा दिनांक राहील. दि. 23 डिसेंबरपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवडणूकीच्या निकालाची अधिसूचना प्रसिध्द करण्याचा अंतिम दिनांक राहील.

जिल्ह्यातील या तालुक्यात होणार निवडणूक अचलपूर- २३, अमरावती- १२, अंजनगाव सुर्जी- १३, भातकुली ११, चांदूरबाजार २४, चांदुर रेल्वे १७, चिखलदरा २६, दर्यापूर- २५, धामणगाव रेल्वे- ७, धारणी- 23, मोर्शी- २४, नांदगाव खंडेश्वर- १७, तीवसा- १२, वरुड- २३

ABOUT THE AUTHOR

...view details