अमरावती :निवडणुकीची अधिसूचना आज प्रसिद्ध करण्यात आली ( Graduate Constituency Election in Amravati ) असून, उमेदवारी अर्ज स्वीकारायला सुरुवात झाली ( Constituency Election in Amravati on January 30 ) आहे. पहिल्या दिवशी एकही उमेदवार अर्ज प्राप्त नाही. उमेदवारी अर्ज 12 जानेवारीपर्यंत ( Result on February 2 ) स्वीकारण्यात येतील. त्याची छाननी 13 जानेवारीला ( Commissioner Dr. Dilip Pandharpatte's information ) होईल. उमेदवारी अर्ज 16 जानेवारीपर्यंत मागे घेता येतील. निवडणूक प्रक्रिया 4 फेब्रुवारीला पूर्ण करण्यात येईल.
विभागातील मतदार संख्या अंतिम मतदार यादीनुसार, अमरावती विभागात 1 लाख 20 हजार 944 पुरुष, 64 हजार 906 महिला व इतर 75 अशा एकूण 1 लाख 85 हजार 925 मतदारांची नोंदणी आहे. त्यात अमरावती जिल्ह्यात 33 हजार 236 पुरुष, 23 हजार 329 महिला, इतर 64 असे एकूण 56 हजार 629 पदवीधर मतदारांची नोंदणी झाली आहे.
जिल्ह्यानुसार मतदारांची संख्याअकोला जिल्ह्यात 27 हजार 943 पुरुष, 16 हजार 552 महिला व 11 इतर असे एकूण 44 हजार 506, तसेच बुलडाणा जिल्ह्यात 26 हजार 161 पुरूष, 10 हजार 336 महिला (इतर शून्य) असे एकूण 36 हजार 497 मतदार नोंदणी आहे. वाशिम जिल्ह्यात 11 हजार 78 पुरूष, 3 हजार 966 महिला (इतर शून्य) असे एकूण 15 हजार 44 आणि यवतमाळ जिल्ह्यात 22 हजार 526 पुरूष, 10 हजार 723 महिला (इतर शून्य) एकूण 33 हजार 249 मतदारांची नोंदणी आहे.
अशी आहेत मतदान केंद्रेविभागात संभाव्य 262 मतदान केंद्रे असतील. त्यात अमरावती जिल्ह्यात 75, अकोला जिल्ह्यात 61, बुलडाणा जिल्ह्यात 52, वाशिम जिल्ह्यात 26 व यवतमाळ जिल्ह्यात 48 केंद्रे असतील. निवडणूक प्रक्रियेसाठी नोडल अधिका-यांच्या नियुक्त्या यापूर्वीच करण्यात आल्या आहेत. मतदान केंद्राध्यक्ष म्हणून 288, मतदान अधिकारी म्हणून 1 हजार 153 व सूक्ष्म निरीक्षक म्हणून 289 अधिकारी व कर्मचा-यांना जबाबदारी देण्यात येत आहे.
मतदारांची करणार जागृतीनिवडणुकीदरम्यान मतदानाच्या प्रक्रियेबाबत भरीव जनजागृती करण्यात येईल. जेणेकरून मतदान बाद होणार नाही. आदर्श आचारसंहितेचे पालन होण्याच्या दृष्टीने यंत्रणा सुसज्ज करण्यात आली आहे. निवडणूक प्रक्रियेदरम्यान कोविड-19 बाबत मार्गदर्शक सूचनांचे पालन होणे आवश्यक आहे. मतमोजणीचे प्रशिक्षण, वाहतूक आराखडा, मतमोजणी केंद्र निश्चिती आदी प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. सहायक आयुक्त श्यामकांत म्हस्के, विवेकानंद काळकर, तहसीलदार वैशाली पाथरे, निकिता जावरकर, रवी महाले, नायब तहसीलदार मधुकर धुळे यांच्यासह अनेक अधिकारी पत्रपरिषदेला उपस्थित होते. उपस्थित होते.