महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

हवाई चप्पल घालणाऱ्यांना हवाई सफर हेच आमचे उद्दिष्ट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बेलोरा येथील अमरावती विमानतळ विस्तारीकरण कार्याचे भूमिपूजन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संबोधित करताना

By

Published : Jul 13, 2019, 3:23 PM IST

अमरावती - उड्डाण योजनेंतर्गत विमानभाडे कमी झाले असताना मध्यमवर्गीय जनता विमानाने प्रवास करायला लागली आहे. म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या संकल्पनेप्रमाणे हवाई चप्पल घालणाऱ्यांनाही हवाई सफर घडविणे, हे आमचे उद्दिष्ट असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती येथे सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संबोधित करताना

बेलोरा येथील अमरावती विमानतळाच्या विस्तारीकरण कार्याचे भूमिपूजन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे, राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, मदन एरावार, खासदार नवनीत राणा, खासदार रामदास तडस, आमदार डॉ. सुनील देशमुख, यशोमती ठाकूर, वीरेंद्र जगताप, रवी राणा, प्रवीण पोटे, प्रभूदास भिलावेकर तसेच महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे उपाध्यक्ष सुरेश काकाणी आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, विदर्भातील अमरावती, अकोला आणि यवतमाळ हे तिन्ही महत्त्वाचे केंद्र आहेत. या तीनही ठिकाणी विमानतळ विकास होणे आज काळाची गरज आहे. अमरावतीनंतर आता अकोला विमानतळाच्या विस्तारीकरणाला सुरुवात होईल. यवतमाळला अजून थोडा वेळ आहे. मात्र, ती जबाबदारी मदन ऐरावर यांनी घ्यावी. अमरावती विमानतळाच्या विकासासाठी आमदार डॉ. सुनील देशमुख यांनी महत्वपूर्ण पाठपुरावा केला. येथे उद्योग मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

नवीन उद्योगांना जागा कमी पडते आहे, अशी परिस्थिती आहे. औद्योगिकदृष्ट्या विकसित होणाऱ्या अमरावतीच्या विकासाला अधिक गती येण्यास येथील विमानतळ महत्त्वाचे ठरणार आहे. सुरुवातीला अमरावती-मुंबई विमानसेवा सुरू झाल्यावर इतर शहरातही अमरावती येथून सुरुवात करण्यात येईल. यासाठी प्रयत्न केले जातील. भविष्यात जेट विमानही अमरावती येथून झेपावतील, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने विमानतळाचे काम उत्तम आणि झपाट्याने करावे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details