अमरावती- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कामुंजा व चांगपूर येथील शासकीय कापूस खरेदी केंद्रावरीवल कापूस खरेदी जिनिंग मालकांनी तात्पुरती बंद केली होती. अमरावतीच्या रेड झोन परिसरातून येथील काम करणारे मजूर येत असल्याने कापूस खरेदी बंद होती. त्यामुळे याचा फटका शेतकऱ्यांना बसणार असल्याची सर्वप्रथम बातमी 'ईटीव्ही भारत'ने प्रसिद्ध करताच प्रशासनाने याची दखल घेतली आहे.
ईटीव्ही भारत ईम्पॅक्ट : वलगावमधील बंद पडलेली शासकीय कापूस खरेदी सुरू
राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री तथा पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी जिनिंग प्रेसींग संस्थेच्या खरेदी प्रक्रियेतील अडचणी दूर करून कापूस खरेदी पूर्वरत सुरू करण्याचे आदेश दिले आहे.
शासकीय कापूस खरेदी सुरू
राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री तथा पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी जिनिंग प्रेसींग संस्थेच्या खरेदी प्रक्रियेतील अडचणी दूर करून कापूस खरेदी पूर्वरत सुरू करण्याचे आदेश दिले आहे. त्यानंतर सोमवारपासून पुन्हा कापूस खरेदीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी बांधवांचा कापूस विक्रीतील अडथळा दूर झाला आहे.