अमरावती -अमरावती जिल्ह्यातील शिरजगाव कसबा या गावात गेल्या अनेक वर्षांपासून लक्ष्मीपूजनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे बलिप्रतिपदेला गोवर्धन पूजा करण्यात येते. यावर्षी देखील मोठ्या उत्साहात गोवर्धन पूजा करण्यात आली. हा सोहळा पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. यावेळी उपस्थित नागरिकांनी गाईंची पूजा केली.
अशी करतात गोवर्धन पूजा
गोवर्धन पूजेमध्ये गाईला महत्व असते. दिवाळीच्या आठ दिवस आधी गावात गोवर्धन पूजाच्या उत्सवाला सुरूवात होते. यामध्ये ज्यांच्याकडे गोधन आहे, त्यांच्याकडे जाऊन आठ दिवस गाईंची पुजा केली जाते. शेवटच्या दिवशी म्हणजे बलिप्रतिपदेच्या दिवशी गाईंची मिरवणुक काढून, गाईंना पुरणपोळीचा नैवेद्य दिला जातो. पुरणपोळी सोबतच गाईंना हिरवा चारा देखील खाऊ घातला जातो.