अमरावती : जिल्ह्यात मालखेड रेया गावालगत ( goods train derail near malkhed ) मालगाडीला अपघात झाला आहे. या अपघातात मालगाडीचे वीस डबे उलटले आहेत. सोमवारी पहाटे हा अपघात घडला. मालखेड लगतमालगाडीला अपघात झाल्याने मुंबई आणि हावडाच्या ( train for Mumbai and Howra ) दिशेने जाणाऱ्या अनेक गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले आहे. काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
नरखेड मार्गावरून गाड्या वळविल्या :रात्री अकरा वदरम्यान कोळसा वाहून नेणाऱ्या मालगाडीचे वीस डबे उरळाखाली घसरून पलटले. अपघात होताच परिसरात मोठा आवाज झाला. अपघाताची माहिती मिळताच रेल्वेचे अधिकारी आणि कर्मचारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले. दरम्यान रात्री बारा वाजता या मार्गावरून जाणारी नागपूर वरून मुंबईच्या दिशेने जाणारी सेवाग्राम एक्सप्रेस रोखण्यात आली. रात्री उशिरा ही गाडी नरखेड लाईन वरून मुंबईच्या दिशेने सोडण्यात आली. पहाटे मुंबईवरून नागपूर आणि हावडा कडे जाणाऱ्या अनेक गाड्या भुसावळ आणि अकोला रेल्वे स्थानकावर बराच वेळ पर्यंत थांबवण्यात आल्या. या गाड्यांना देखील नरखेड मार्गाने हळूहळू सोडण्यात ( goods train accident in Amravati )आले.